पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार




पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार

पनवेल (संजय कदम) : कळंबोली वसाहतीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पाणी मीटरची चोरी करणाऱ्या आरोपींना नुकतीच कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी कळंबोली पोलिसांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत. 

               शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्यासह उपशहर प्रमुख नरेंद्रसिंग होठी, उपशहर प्रमुख संजय भालेराव, शहर संघटक अरविंद कडव, विभाग प्रमुख महेश गुरव, उपविभाग प्रमुख तुषार निडाळकर, शाखाप्रमुख महेश दिघे यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांची भेट घेऊन त्यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने कळंबोली आणि नवीन पनवेल येथे लाखो रुपये खर्च करून लावलेलं पाणी मीटर चोर मोठ्या शिताफीने पाईपसकट काढून नेत होते. यामुळे कमालीचे हैराण झालेल्या नागरिकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कळंबोली पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांसह एका भंगार विक्रेत्याला अटक करून त्यांच्याकडून ५४ मीटर्स जप्त केले होते.

फोटो : वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांचे आभार मानताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर व इतर पदाधिकारी

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर