महिलांचे संरक्षण ही काळाची गरज






महिलांचे संरक्षण ही काळाची गरज

21 व्या शतकात देखील कुटुंब आणि समाजामध्ये महिला सुरक्षित नाहीत दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या नवीन घटना समोर येत आहेत आजही आपल्या देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळे महिलांना दुय्यम स्थान दिले जाते स्त्रीयांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे ही संकल्पना रूढ आहे स्त्री ही जन्माच्या आधी आपल्या आईच्या पोटामध्ये देखील सुरक्षित नाही महिला आपल्या घरात तरी सुरक्षित असाव्यात परंतु त्या घरात देखील सुरक्षित नाहीत त्यांना घरात आणि बाहेर देखील सतत भिऊन आणि दडपणाखाली राहावे लागते महिलांच्या मनातील असुरक्षितेची भावना नष्ट व्हावी यासाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत आईच्या गर्भामध्ये तिच्या सुरक्षेसाठी स्त्री भ्रूण हत्या हा कायदा केला आहे विवाहानंतर कौटुंबिक छळापासून बचावासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा असे दोन कायदे आहेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे शासनाने महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवले आहेत त्यामुळे आजच्या काळातील महिला सक्षम बनल्या आहेत तरी देखील महिला सुरक्षित नाहीत एक स्त्री शिकली तर सगळे कुटुंब शिकते महिलांना प्रत्येक पुरुषाने सन्मानाने वागवले पाहिजे आणि आपल्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येक पुरुषांनी घेतलीच पाहिजे 

श्री अण्णासाहेब बिचुकले रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर