सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण "प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते उपक्रमाची सुरुवात"

 सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण

"प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते उपक्रमाची सुरुवात"



सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक  संघातर्फे वृक्षारोपण रविवार दिनांक १६.०७.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नवनाथ मंदिरा समोरील रस्ता, पनवेल रेल्वे स्टेशन(पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी फक्त वृक्षारोपण न करता त्याची देखभाल संस्थेमार्फत केली जाणार आहे जेणेकरून निसर्गाचे संवर्धन करण्याच्या कार्यात संस्थेचा सुद्धा हातभार असेल. मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उपक्रमास सुरूवात करण्यात आली.पनवेल रेल्वे स्टेशन ते पनवेल एस टी स्टॅन्ड पर्यंतच्या रस्ता दुभाजकावर कादंब, कन्हेरे,कांचन, कडुलिंब, बदाम व इतर देशी पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला . मंडळाचे कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते, तसेच पर्यवरणप्रेमी हितचिंतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन १०० वृक्षांची लागवड केली, सदर वृक्षांची देखभाल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ करणार आहे, मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष श्री संतोष चव्हाण, उपाध्यक्ष सौ प्रिया खोबरेकर, सचिव रामचंद्र मोचेमाडकर, खजिनदार दीपक तावडे, सहखजिनदार बाबाजी नेरूरकर आणि सदस्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन ही झाडे लावली आहेत.

        गेल्यावर्षी १०० आणि हया वर्षी १०० अशी दोनशे झाडे लावून मंडळाने निसर्ग संवर्धन कार्य उत्तमरित्या पार पडले आहे. ह्या वृक्षारोपण अभियानाद्वारे निसर्ग संवर्धन तर होतेच शिवाय समाजाप्रती सिंधूदुर्गवासीयांच्या मनात असलेला मायेचा ओलावा तमाम रायगड वासीयांच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.


*कोट*

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे नेहमीच चांगले उपक्रम घेतले जातात. गेल्यावर्षी लावलेली झाडे त्यांनी बोलल्याप्रमाणे जतन करून वाढवली आहेत. पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी सुरू केलेले उपक्रम पनवेलकरांना नक्कीच अभिमानास्पद आहे. यापुढेही त्यांच्या प्रत्येक उपक्रमात आमचा सहभाग त्यांच्यासोबत नक्कीच असेल:- (श्री.प्रितम म्हात्रे, मा.विरोधी पक्ष नेते)

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर