भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाहिले चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण

 



भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाहिले चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण

 पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉॅलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी चांद्रयान-३ (चंद्र मोहिम) चे थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.  खगोलशास्त्र प्रेमी विद्यार्थी भारताच्या या चंद्र मोहिमेचे साक्षीदार झाले, त्यामुळे त्यांच्यात वैज्ञानिक जिज्ञासा वाढली.  
चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षामार्फत सहाय्यक प्राध्यापक हिमांशू मोरे यांनी प्रभारी प्राचार्या धनश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थी व प्राध्यापक आणि खगोलशास्त्र प्रेमींना अंतराळ संशोधनाच्या विस्मयकारक जगात प्रबोधन करणे हा होता. या चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणातून, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना चांद्रयान-3 चे प्रक्षेपण आणि त्यानंतरच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली,अंतराळ संशोधन आणि वैज्ञानिक प्रगतीमध्ये त्याचे महत्त्व याविषयी सखोल समजून घेता आले,विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळाली. महाविद्यालयानेे विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली.या उपक्रमात प्रा. भाग्यश्री एन.कांबळे, सहाय्यक. प्रा. अपराजिता ए. गुप्ता, सहाय्यक. प्रा. रवनिश बेक्टर, पल्लवी खोत, हृषिकेश हुद्दार, उज्वल पाटील, विश्वास ठाकूर यांचे सहकार्य लाभले.

Comments

Raigad Mat said…
खूप. छान

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर