नवी मुबंई येथे दहशतवाद विरोधी पथकाने 64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट
नवी मुबंई येथे दहशतवाद विरोधी पथकाने 64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट
पनवेल (वार्ताहर) : दहशतवाद विरोधी पथकाने विविध कारवाईंमध्ये जप्त केलेला एकूण 161 किलो वजनाचे (अंदाजे 64 कोटी 36 लाख रूपये किंमतीचे अंमलीपदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या बंदीस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आले.
केंद्रीय गृह अमित शाह यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत 'ड्रग्स ट्राफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी' या विषयावर दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनादरम्यान अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे नष्ट करण्यात येणाऱ्या मालाचा आढावा घेतला. त्यावेळी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांच्या उपस्थित अंमली पदार्थ नाश समितीच्या अध्यक्षा पोलीस अधिक्षक (गुप्तवार्ता) शीला साईल, अंमली पदार्थ नष्ट करणाऱ्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत दहशतवाद विरोधी पथकाकडून ६४ कोटी ३६ लाख रुपयाच्या अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. यावेळी सन २०२३ मध्ये मागील ३ महिन्यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे एकुण ४००० किलो इतक्या वजनाचा व ५००० कोटी किंमतीचा मुद्देमाल यशस्वीरित्या नाश केला आहे.
फोटो : दहशतवाद विरोधी पथकाने 64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट
Comments
Post a Comment