पंचक्रोशी विकास संघटना कमेटी 15 गाव कासारकोन्ड ते खुजारे या गावच्या विकासाठी एकत्र - संजय तटकरे
पंचक्रोशी विकास संघटना कमेटी 15 गाव कासारकोन्ड ते खुजारे या गावच्या विकासाठी एकत्र - संजय तटकरे
श्रीवर्धन (रायगड मत)
श्रीवर्धन तालुकातील चार ग्रामपंचायत वाकलघर, दांडगुरी, नागळोली, खुजारे ग्रामपंचायत मिळून 15 गाव / वाडी कासारकोंड ते खुजारे, मिळून पंचक्रोशी असून निसर्ग ने भरभरून देऊन हा भाग मिनी महाबळेश्वर केला आहे. पांडव कालीन कुशमेश्वर देवस्थान, गंगादेवी, गजानन महाराज मंदिर, बाजूलाच खेटून शिवकालीन "मदगड किला" असून या भागाचा विकास झाला तर पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. येथील लोकांना कामधंदा उपलब्ध होईल जेणेकरून शहरात जाणारे लोंढे कमी होतील. मुळात जे काही अल्प शेतकरी आहेत ते माकडांच्या हैदोसनी त्रस्त आहेत, पंच क्रोशीतील अरुंद रस्ते पर्यटनाला मारक आहेत श्रीवर्धन, दिवेगार सारख्या पर्यटन क्षेत्राला खेटून असलेली पंचक्रोशी विकासापासून वंचित आहे प्रत्येक गाव आपापल्या परीने गावचा विकास करत आहे परंतु पंचक्रोशीतील जुने सामाजिक कार्यकर्ते मृत्यू पावले आहेत किंवा वयोरुद्ध झाले आहेत त्या मुळे पंच क्रोशीचा विकास खुंटला आहे. अश्या निसर्गानी दिलेल्या वैभवशील पंच क्रोशीचा विकास व्हावा हीच पंच क्रोशीतील लोकांची भावना असून त्या साठी पंचक्रोशी विकास संघटनेची स्थापणा झाली असून ती त्या दृष्टीने काम करत आहे.
नुकतीच दादर दामोदर हॉल येथे पंचक्रोशी विकास संघटना कमेटी व (15 गाव कासारकोन्ड ते खुजारे) यांची पंचक्रोशी संघटना व प्रत्येक गाव मुबंई अध्यक्ष, सचिव, खजिनदार सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष संजय तटकरे यांच्या अध्यक्ष ते खाली पंच क्रोशी तील विकास कामासाठी व पंच क्रोशी चा एकोपा व अडचणी या वर सखोल चर्चा होऊन पुढील कामकाज करावे असे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दिवेगार बीच पासून जवळ असणाऱ्या या गावांचा विकास व्हावा आणि रोजगार उपलब्ध करावा असा आमचा मानस आहे असे संजय तटकरे यांनी "रायगड मत" कडे आपले मनोगत सांगितले. यामुळे तरुण वर्गात एकच उत्साह संचारला आहे.
Comments
Post a Comment