महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई* 





महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई* 

आज दिनांक२३-६-२०२३, वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा, समाज मंदिर हॉल गुरुतेग बहादुर सिंग नगर, सरदार नगर, अँटॉप हिल सायन कोळीवाडा , प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलवन यांच्या उपस्थितीत प्यारा स्विमर श्री राजाराम घाग, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्वदूर अशा जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेमध्ये आज महिला गट आणि पुरुषांचे गटांच्या स्पर्धा त्यांचा निकाल खालील प्रमाणे, 

पुरुष गट: ५९ किलो:-१) धर्मेंद्र यादव, मुंबई शहर, २) वैभव थोरात, औरंगाबाद ३) निरज कुमार यादव, मुंबई उपनगर.

६६ किलो:- १) व्यंकटेश कोणार मुंबई उपनगर, २)साहिल उतेकर, मुंबई शहर,३) सिद्धेश काजोलकर, पुणे ,७४ किलो:-१) विजय फासले, मुंबई उपनगर २) विजय शेलार, नवी मुंबई.३) ओमकार वाणी,कोल्हापूर

महिला गट:-४७ किलो:- १)काजल भाकरे, ठाणे, २)हर्षदा घुले, मुंबई उपनगर ३)अमृता भगत रायगड ,५२ किलो:-१)कामिनी भोत्सॆ,ठाणे२) सुष्मिता देशमुख,ठाणे 

३)मोनीका अगवणे,मुंबई उपनगर ५७ किलो:-१)सेजल मकवाना, मुंबई उपनगर २)निवेदिता खारकर मुंबई शहर,३) नरसम्मा बसवाल,मुंबई उपनगर

६३ किलो:-१) सलोनी मोरे रायगड २)प्रिया कांदळकर,मुंबई उपनगर,३) राजश्री पेलनेकर मुंबई शहर

 या या समयी खेळातील बुजुर्ग म्हणून असलेले जुने जाणते असे १९८८ मध्ये राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेले विश्वनाथ सावंतसर आणि वाल १९७२-७३ पासून पॉवरलिफ्टिंग या खेळाशी संबंधित असलेले नरेश विनरकर सर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर