प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये महारोजगार मेळावा; नामदार उदय सामंत, नामदार मंगलप्रभात लोढा यांची लाभणार प्रमुख उपस्थिती

 

 प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये महारोजगार मेळावा;
नामदार उदय सामंत, नामदार मंगलप्रभात लोढा यांची लाभणार प्रमुख उपस्थिती 


पनवेल(प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवार दिनांक २४ जून रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यास राज्याचे उद्योग मंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 
      प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड- अलिबाग, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम २४ जून रोजी सकाळी ०९ वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात होणार आहे.
 यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कॉ. भूषण पाटील, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर