श्रीवर्धन मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
श्रीवर्धन मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
पिल्लई कॉलेज रसायनी व रॉयल एज्युकेशनल सोसायटीतर्फे उपक्रम
रायगड मत (श्वेता भोईर):
दहावी व बारावीचे निकाल नुकताच जाहीर झाले आहेत. वर्षभर कठोर मेहनत घेऊन अभ्यास करून या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस व रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ ए आर उंडरे हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन येथे या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच भविष्यात शैक्षणिक मार्ग निवड व करिअरच्या संधीं या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.
पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पसतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये सॅटेलाइट मेकिंग हँडऑन अॅक्टिव्हिटी, इसरो, डिझाइन थिंकिंग, करिअर गाइडन्स व अश्या अनेकविध विषयांवर सेमिनारचे आयोजन विविध शाळा कॉलेजेस मध्ये केले जाते. व पुढेही अश्या प्रकारचे उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही यावेळी पिल्लईच्या उपस्थित कम्युनिटी आउटरीच ऑफिसर्स यांनी सत्कार सोहळा कार्यक्रमात दिली.
यावेळी आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी महात्मा एजुकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पसचे कम्युनिटी आउटरीच ऑफिसर्स यांच्यासह रॉयल एजुकेशन सोसायटीच्या डॉ. ए आर उंडरे स्कुल्स अँड कॉलेजचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
Comments
Post a Comment