तळा बाजारपेठेतील रस्‍त्‍यांनी घेतला मोकळा श्‍वास नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान

 



तळा बाजारपेठेतील रस्‍त्‍यांनी घेतला मोकळा श्‍वास नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान*


तळा संजय रिकामे 


रायगड जिल्ह्यातील शहरांसह गावांचे केवळ सुशोभीकरणच न करता स्वच्छ्ताही व्हायला हवी, या उद्‌देशाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत क्षेत्रातील अस्वच्छ जागा तसेच अनधिकृतपणे टपऱ्या हटविण्याची मोहीम शुक्रवारी पार पडली.तळा नगरपंचायत ते बळीचा नाका ते भोईर वाडी पर्यंतचा मुख्य रस्ता या रस्त्यावर  स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेची जबाबदारी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर शहारातील प्रत्‍येक नागरिकांची आहे. आपल्या परिसराची दैनंदिन स्वच्छ्ता ठेवली पाहिजे तसेच दुकानाच्या बाहेर अनधिकृतपणे टपर्‌या, पत्रे टाकले असल्‍यास तातडीने काढावे, अशा सूचना मुख्याधिकारी माधुरी मेकडे  यांनी केल्‍या आहेत. स्वच्छ्ता मोहिमेत नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्य चंद्रकांत रोडे, विरोधी पक्ष नेत्या नेहा पांढरकामे, तहसीलदार स्वाती पाटील,नगरसेवक नगरसेविका नगरपंचायत कर्मचारी पोलीस कर्मचारी प्रतिष्टीत नागरिक आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

               अभियानात रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील नाले, गटारे, दुभाजक आदी गोष्टींची साफसफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना सुरक्षितरीत्‍या चालता यावे, यासाठी रस्ते मोकळे करण्यात आले. मुख्य रस्त्यावरील काही दुकानदारांनी स्वतःहून गटारावरील अनधिकृत बांधकाम, टपऱ्या हटवल्‍या. नगरपंचायत कडून अशा प्रकारे नियमित कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.


*माधुरी मडके मुख्याधिकारी तळा नगरपंचायत*


रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली तळा शहरात स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली, मात्र नागरिकांनी दैनंदिन जीवनात नेहमीसाठीच स्‍वच्छतेचा अवलंब करावा. घरातील कचरा घंटा गाडीतच टाकावा, कोणत्याही प्रकारच्या प्लास्‍टिक बाटल्‍या, पिशव्या किंवा इतर कचरा गटारात किंवा नाल्‍यात टाकू नये, आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर