आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आदर्श खरसई शाळेत १००% आयोजन *- समाजसेविका रेखा धारीया*
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आदर्श खरसई शाळेत १००% आयोजन *- समाजसेविका रेखा धारीया*
रायगड मत-म्हसळा # जयसिंग बेटकर
म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेत 100 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
यावेळी सोमजाई माता क्रीडा मंडळ चे संस्थापक, अध्यक्ष चंद्रकांत खोत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर, उपाध्यक्ष जनार्दन खोत, समाजसेविका. धारीया मॅडम , सामाजिक वनीकरण चे भिमराव सुर्यतळ,सुनंदा पाटील , सदस्य अनिल कासारे, गणेश मांदाडकर, पुष्पा पयेर , अश्विनी खोत, मुख्याध्यापिका कोळसे मॅडम, संदिप शेबांळे, राम थोरात जयसिंग बेटकर, अजय पयेर , काशिनाथ कोकाटे तसेच विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत खोत यांनी आंतरराष्ट्रीय योग 21 जून. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केला आहे. गेली अनेक वर्षे योग विद्या हि भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगासने आसने वेळोवेळी केल्याने आजाराला दूर लोटले जाते, योगामध्ये सातत्य ठेवल्याने शरीर सुदृढ रहाते आणि आनंद मिळतो असे मनोगतात सांगितले . धारीया मॅडम यांनी सांगितले खरसई मराठी शाळेत सुंदररित्या अगदी लहानपणापासून बालके योगासने करतात याचे कौतुक केले खरसई गावातून अनेक खेळाडू घडलेत. यामध्ये हेमंत पयेर, उत्तम मांदारे, सागर शितकर यांचा उल्लेख करून खरसई गाव म्हसळा तालुक्यात हे खेळाची खाण असा उल्लेख करून उद्याचे आदर्श विद्यार्थांना प्रेरणा दिली तसेच गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असे मत व्यक्त केले, शिक्षण प्रेमी महेश पाटील यांनी खरसई गावातील योगासने खेळात तालुका, जिल्हा, विभाग, व राज्य स्तरावर नेतृत्व केल्या बद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक उत्तम मांदारे सर यांचे विशेष उल्लेख केला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष निलेश मांदाडकर आणि उपाध्यक्ष जनार्दन खोत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
गुरूकुल आरोग्य योगपिठ कोल्हापूर संचलित शाखा खरसई चे टिम सर्व विद्यार्थी, खेळाडू सहभागी झाले होते.यावेळी विविध आसने घेण्यात आली आणि उत्सुर्तपण विद्यार्थी सहभागी झाले.
यावेळी मुख्याध्यापिका शारदा कोळसे मॅडम यांनी उपस्थित मान्यवर यांचे स्वागत व आभार मानले.
Comments
Post a Comment