शासन आपल्या दारी"**श्रीवर्धन तालुक्यात विविध दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*"शासन आपल्या दारी"**श्रीवर्धन तालुक्यात विविध दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
प्रतिनिधी/संदीप लाड
राज्य शासनाच्या "शासन आपल्या दारी" या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीवर्धन तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांच्या पुढाकारातून तहसिलदार कार्यालयामार्फत श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांसाठी दि.17 जून 2023 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे शैक्षणिक दाखले, पीएम किसान योजना, ई-केवायसी, आधार अपडेशन, पोष्ट बँक खाते उघडणे, रेशनकार्ड देणे अशा विविध शासकीय लाभांबाबत एकदिवसीय विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४००हून अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला
या शिबिरात श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना दाखले उत्पन्न दाखले, वय व अधिवास दाखले, नॉन क्रिमिलेयर दाखले, ईडब्ल्यूएस दाखले ,पीएम किसान ई केवायसी करणे- पोष्ट बँक खाते उघडणे - आधार कार्ड अपडेशन करणे- शिधापत्रिका - या सेवा पुरविण्यात आल्या.
या शिबिराच्या वेळी प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्यासह तहसिलदार महेंद्र वाकलेकर, नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के,मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर,तलाठी सुदर्शन पालवे,बाळकृष्ण भामरे, मिलिंद पुट्टेवाड, देवकांत,पुरवठा विभागाचे हरिश्चंद्र पाटील,दामोदर ठाकूर, कर्मचारी व कोतवाल, सेतू केंद्राचे कर्मचारी, सीएससी केंद्राचे कर्मचारी, स्टॅम्प वेंडर तसेच श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकार व प्रतिष्ठित नागरीक यांनी उपस्थित राहून हे शिबीर यशस्वी संपन्न होण्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले.
तालुका प्रशासनाच्या वतीने तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांनी सर्वाचे आभार मानले असून तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांनी पीएम किसान ई केवायसी देखील करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment