"रायगडचे सुहानी गावडे,कुणाल पिंगलेआणी अथर्व्ह लोधी राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा साठी रवाना"
सुहानी गावडे,
अथर्व्ह लोधी.
कुणाल पिंगळे
"रायगडचे सुहानी गावडे,कुणाल पिंगलेआणी अथर्व्ह लोधी राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा साठी रवाना"
पनवेल (अरुण पाटकर): झारखंडमध्ये "रांची"येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर मुले आणि मुली यांची पॉवरलिफ्टींग स्पर्धा होणार आहे.ही स्पर्धा ०६जून ते ११ जून २०२३ या कालावधीत होणार आहे.या राष्ट्रीय स्पर्धा साठी एकूण ५६२खेळाडू भाग घेणार आहेत.या मध्ये ३३४पुरुष आणि २२८महिला खेळाडू येणार आहेत.या राष्ट्रीय स्पर्धेतून दिंनाक २४ ऑगस्ट ते ०३सप्टेंबर२०२३ या कालावधीत "रोमानिया"मधील क्लुझ नेपोका या ठिकाणी होणाऱ्या जागतिक सब ज्युनियर आणि ज्युनिअर स्पर्धेस भारतीय संघाची निवड होणार आहे.त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग संघात रायगड ची "सुहानी संतोष गावडे"(सार्व. व्यायाम शाळा, वाढगावं)हीची सब ज्युनिअर स्पर्धेस ४३किलो वजनी गटात निवड झाली आहे. तर मुलांचे सब ज्युनिअर स्पर्धा८३ किलो गटासाठी" अथर्व लोधी(संसारे फिटनेस,पेण)आणि ज्युनिअर स्पर्धा ५३किलो वजनी गटा साठी "कुणाल पिंगळे"(लोखंडे जिम,खोपोली) याची निवड झाली. या स्पर्धकांना"पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीने अध्यक्ष गिरीष वेदक,(पनवेल)माधव पंडित,(रसायनी)सुभाष टेंबे(माणगाव)यांनी शुभकामना दिल्या आहेत.
Comments
Post a Comment