...तर, प्रीतम म्हात्रे खासदार होतील? # मावळ लोकसभा मतदार संघ ते जिंकू शकतील. #राजकारणात काहीही घडू शकते 8 वी पास श्रीरंग बारणे खासदार होऊ शकतात, तर उच्च शिक्षित प्रीतम म्हात्रे का नाही?

 



...तर, प्रीतम म्हात्रे खासदार होतील?

मावळ लोकसभा मतदार संघ ते जिंकू शकतील.
#राजकारणात काहीही घडू शकते
8 वी पास श्रीरंग बारणे खासदार होऊ शकतात, तर उच्च शिक्षित प्रीतम म्हात्रे का नाही?

पनवेल (रायगड मत/जितेंद्र नटे)


सध्या पावसाळा जवळ जरी आला असला तरी राजकारणाचा तवा मात्र तापू लागला आहे. या तव्यावर आपली भाकरी कशी शेकवायची आणि 5 वर्षे जनतेला कसे शेकवायचे याच्यातच लबाड राजकारणी गर्क आहेत. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधी काहीं घडेल कधी कोण जिंकेल आणि कधी कोण क्लीन बोल्ड होईल सांगू शकत नाही.

सध्या चर्चा सुरू आहे ती मावळ मतदार संघातील उमेदवाराची. का चर्चा चालू आहे? का सर्वांना अचानक वाटू लागले की आपण इथे जिंकू शकतो? कारण शिवसेनेचे खासदार शिवसेना सोडून शिवसेनेत गेले आहेत. वाचताना गडबडलात ना? अशीच गडबड होणार आहे मतांची म्हणूनच सगळ्यांना इथं आपली डाळ शिजू शकते असे वाटू लागले आहे.

इथले खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेत, खऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेत नाहीत. आणि लोकांनी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दैवत म्हणून मतदान श्रीरंग बारणे यांना केले होते. यावेळी श्रीरंग बारणे हे शिंदे गटाकडून उभे राहतील त्यांना कट्टर शिवसैनिक मतदान करणार नाहीत यात शंकाच नाही. म्हणून ते पडतील असा राजकीय पंडित म्हणत आहेत आणि 'रायगड मत'च सर्व्हे रिपोर्ट सुद्धा हेच सांगत आहे.

मात्र याच मतदार संघातून आदिती तटकरे यांना उभे करायचे असा शरद पवार यांचे "मत" आहे. मात्र अदिती तटकरे यांचे कार्यक्षेत्र नाही. त्या दक्षिण रायगड जिल्ह्यात सक्रिय आहेत. उरण, पनवेल, कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तीन तालुके जरी मावळ मतदार संघात असले तरी त्यांना जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तिकडे उरणचे महेंद्रशेठ घरात उमेदवारी मागत आहेत किंवा कार्यकर्ते मागणी करीत आहेत अशी बतावणी चालली आहे. त्यांनी पुडी सोडली आहे. ते सध्या काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यात राष्ट्रवादी की काँग्रेस असा संघर्ष वाढेल. तिकडे अजित दादा पवार यांची पिंपरी चिंचवड, मावळ इकडे राष्ट्रवादीचे मत आहेत तर इकडे उरण, पनवेल, कर्जतमध्ये ज्याचा जोर असेल तो जिंकेल. मागील इलेक्शन मध्ये शिवसेना भाजप युती होती. म्हणून बारणे जिंकून आले मात्र आता ते निवडून येणार नाहीत हे राजकीय गणित राजकारणातील धुरंधर जाणून आहेत. म्हणूनच इथे आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राजकारणात कधी फासे उलटे पडतील ते सांगू शकत नाहीत.
म्हणूनच लोकांना स्वछ प्रतिमेचा माणूस हवा आहे, आणि पनवेलचे प्रीतम म्हात्रे यासाठी पात्र आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. पनवेल महानगर पालिकेचे मा. नगरसेवक व माजी विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांचा राजकीय आलेख मोठा जरी नसला तरी तरी संधी मिळालीच तर ते संधीचे सोने करतील यात शंकाच नाही. शांत स्वभाव, जबरदस्त जनसंपर्क आणि सतत समाजसेवत व्यस्त असणारी त्यांची ओळख आहे. ते जर उभे राहिले तर जिंकू शकतील असे 'रायगड मत' सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. प्रीतम म्हात्रे उभे राहिले पाहिजेत मात्र शेकापच्या चिन्हावर नव्हे तर राष्ट्रीय पक्षाच्या चीन्हावर ते निवडुंन येतील. शेकापचे चिन्ह शहरात चालत नाही. शहरातील मतदार हे राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हाकडे आकर्षित झालेलं दिसतात.
रायगड जिल्ह्यात शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी या चौघांची आघाडी आहे. या सर्वांची मते एकत्र मिळाल्यास आघाडीचा उमेदवार जिंकू शकतो. प्रीतम म्हात्रे हे तरुण उमेदवार आहेत. ते उभे राहिल्यास सर्व मीडिया ही त्यांना सहकार्य करेल कारण मीडियाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. एक तरुण वर्गातील वेगळी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे. एका खासदरकीचा खर्च जवळ जवळ 300 करोडच्या आसपास जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खर्च करण्याची ऐपत त्यांच्याकडे आहे. प्रीतम म्हात्रे कधी तरी आमदार होतील अशी सर्वाना आशा होती/आहे. मात्र राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काय घडेल शेवटी हे कोणीच सांगू शकत नाही? कदाचित त्यांच्या नशिबी थेट खासदारकी असू शकते. प्रयत्न करायला काय हरकत आहे. शहरीकरणात झपाट्याने वाढलेल्या मावळ मतदार संघाला सध्या दमदार नेतृत्वाची गरज आहे. सध्याचे खासदार श्रीरंग बारणे हे काहीं ठोस करू शकलेले नाहीत. रोजगारासाठी एखादा मोठा प्रोजेक्ट ते आणू शकलेले नाहीत. किँवा शहरातील लोकांची तहान भागेल असे काही नवीन धरण निर्मिती केलेले नाही. मावळ मतदार संघामध्ये विशेष काही ते करू शकले नाहीत. तटकरे हे सद्याचे रायगड जिल्हा खासदार आहेत. तेही काही 4 वर्षांत विशेष करू शकलेले नाहीत. आदिती तटकरे उभ्या राहिल्या तर प्रत्येक वेळी तटकरे कुटूंबातीलच व्यक्ती म्हणून सुद्धा लोक विचार करतील. मग बाकीच्यांनी करायचे काय? विरोधक उलटा प्रचार करतील.
बदल हा हवाच त्यामुळे दमदार तरुण, सस्वच्छ प्रतिमेचे आणि होतकरू काही तरी करून दाखविण्याची धडपड असणाऱ्या प्रीतम म्हात्रे यांना संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील यात शंकाच नाही. प्रीतम म्हात्रे उभे राहिल्यास "राम"गडावरून छुपा पाठींबा मिळेल. बघूया तोपर्यंत पावसाची वाट, मोका सभी को मिलता हैं, और मोका अच्छे आदमीको मिलना भी चाहीये. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर