३९ वा वाढदिवसानिमित्त ओव्हल मैदान येथे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजन.*

 



३९ वा वाढदिवसानिमित्त ओव्हल मैदान येथे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजन.*

          

मुंबई प्रतिनिधी   - श्री.महेंद्र सखाराम जाधव यांचा ३९ वा वाढदिवस ओव्हल मैदान मुंबई येथे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक हौशी क्रिकेट खेळाडूंच्या उपस्थित साजरा होणार आहे.

         गेली ८/९ वर्ष असे नियोजन करण्यात येत आहे.

दि. ४ जून २०२३ या दिवशी ओव्हल मैदानावर नामांकित क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित संघांना संधी असणार आहे. 

      म्हसळा तालुक्यातील सामाजिक निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून श्री महेन्द्र सखाराम जाधव यांच्या कार्याचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, आरोग्य क्षेत्रात ओळख आहे. तसेच शैक्षणिक उपक्रम- शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप ,गरजु विद्यार्थांना सहकार्य, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहीले आहेत. त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्यातील श्रमजीवी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच, दि म्हसळा टाईम्स यांच्यातर्फे युवा सामाजिक पुरस्कार म्हणुन गौरविण्यात आले, मुंबई व स्थानिक ठिकाणी विविध सामाजिक मंडळातर्फे व सेवाभावी संस्था मार्फत गौरव यथोचित करण्यात आले आहे.

         ४ जुन 2023 ला होणा-या क्रिकेट स्पर्धेत आकर्षक बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे. आठ (८) भव्य दिव्य चषक तसेच वाढदिवस भेट म्हणून विशेष चांदीचे दोन चषक ठेवण्यात आले आहेत.  

          तसेच या स्पर्धेत वाढदिवस लकी कुपन ३५२ खेळाडूंची ओव्हल मैदानावर होणार आहे. आकर्षक बक्षिसे (१) सोन्याची अंगठी (१) टिव्ही (५) इस्त्री (१०) भिंतीवर चे घड्याळ असे व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

            तसेच क्रिकेट मैदानावर खेळाडूंच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.  या स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर