ठाकरोली विभाग समाज भवनचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते








 ठाकरोली विभाग समाज भवनचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते

 वाढीव १५ लाख निधीचे तात्काळ पत्र देऊन पुढील कामाला चालना

म्हसळा - २१ मे २०२३ रोजी म्हसळा तालुका कुणबी समाज संघटना दक्षिण ठाकरोली विभाग भव्य वास्तू चे उद्घाटन श्रीकृष्ण वाडी (कोकबल) येथे मा. खा.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कुणबी समाज तालुका अध्यक्ष महादेव पाटील, कृषी संवर्धन माजी सभापती बबन मनवे, उपनगराध्यक्ष सुनीलजी शेडगे कुणबी समाज नेते कृष्णा कोबनाक, कुणबी संघ उपाध्यक्ष बबन उंडरे,रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शंकर बेटकर, शंकर तिलटकर, नथुराम घडशी तालुका अध्यक्ष समिर बनकर, मुंबई सरचिटणीस महेश शिर्के, माजी उपसभापती संदिप चाचले,उपाध्यक्ष महेंद्र टिंगरे , महिला अध्यक्षा स्नेहा खापरे, मिना टिंगरे, स्नेहा सोलकर माजी सभापती छाया म्हात्रे, विभाग अध्यक्ष रमेश शिंदे, दिलिप मांडवकर, मोहन शिंदे,सदा आग्रे, राजु जाधव, नथुराम भुवड, संतोष घडशी, अनिल बांद्रे ,संजय ठोंबरे, महेंद्र घडशी, मनोज मोरे,भरत बांद्रे सुनिल सोलकर,संदिप मोरे,रघुनाथ गोणबरे यावेळी विशेष सन्मान नथुराम काताळे, व सतीश शिगवण यांचा करण्यात आले. 

           खा साहेब यांनी मार्गदर्शन मध्ये सांगितले की, आपल्या विभागाला या पुढे कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. या भागातील महिला वर्ग यांनी स्थानिक ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून नवीन जोड व्यवसाय काही करता येईल का नक्कीच विचार करून अशावेळी सामाजिक भवनचा उपयोग करावा असे प्रमुख मार्गदर्शनात सांगितले तसेच म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजाचे शिल्पकार स्व एस डी शिंदे व गणपत कातकर यांच्या कार्याला उजाळा देत. अनेक समाज नेत्यांचा उल्लेख केला. यावेळी प्रास्ताविक मुंबई विभागीय अध्यक्ष रमेश शिंदे यांनी मांडले, मनोगत स्थानिक अध्यक्ष दिलीप मांडवकर व जेष्ठ समाजसेवक बबन उंडरे यांनी व्यक्त केले.दक्षिण विभागातील २० गाव मधील बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.शाहिर भिमराव सुर्यतळ, माई पायकोली शाहिर दिलीप शिंदे, शुभम शिंदे यांनी समाजिक जीवनावर गीत सादर केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम तीलटकर यांनी केले व आभार प्रदर्शन सदानंद आग्रे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर