श्रृती सुनिल शिगवण हिचा ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे कुणबी समाजाच्या वतीने कौतुक
श्रृती सुनिल शिगवण हिचा ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे कुणबी समाजाच्या वतीने कौतुक
म्हसळा - ग्रामस्थ व महिला मंडळ (स्थानिक - मुंबई)आणि वाघेश्वर क्रिकेट संघ कुणबी समाज तोंडसुरे यांच्या वतीने गावातील सुकन्या श्रृती सुनिल शिगवण हिने नुकत्याच झालेल्या रायगड पोलिस भरतीत ती पात्र ठरली आहे. म्हणून या चमकदार कामगिरी बद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच एक हात मदतीचा म्हणून पुढील शैक्षणिक सहकार्यासाठी आर्थिकदृष्ट्या सहाय्य केले.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित गावचे सरपंच सुरेश महाडीक, गोविंद महाडीक ग्रामीण अध्यक्ष, सुरेश गुणाजी महाडिक मुंबई अध्यक्ष, विशेष निमंत्रित पाहुणे आदर्श शिक्षक नरेश सावंत सर , गणेश भायदे युवा कार्यकर्ते,समाजसेवक जलालभाई जहांगीर, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर , क्रिडा मंडळ अध्यक्ष वसंत महाडीक, सेक्रेटरी प्रकाश बांद्रे, उपाध्यक्ष मनेष बांद्रे, विनोद जाधव , कर्णधार रोहन महाडीक,उपसेक्रेटरी, गाव सदस्य प्रकाश महाडिक, तुकाराम महाडीक, सुनील शिगवण, शैलेश शिगवण, महिला अध्यक्षा लक्ष्मीबाई बांद्रे, हिना महाडीक,भिमा महाडीक आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी करिअर मार्गदर्शन बाबत मार्गदर्शन केले. श्रृती शिगवण सारखे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून नक्कीच म्हसळा तालुक्यात सरकारी नोकर भरती मध्ये आपल्या स्थानिक तरूणांची संख्या वाढली पाहिजे. असे व्यासपीठावर मनोगत मांडण्यात आले. यावेळी श्रृती शिगवण हिने अतिशय घरच्या कठिण परिस्थितीवर मात करून यश संपादन केले व मनापासून अभ्यास करून यशस्वी झाल्याबद्दल तसेच वेळोवेळी आई वडील,भाऊ यांनी सहकार्य केले. व ग्रामस्थ यांनी सुध्दा मोलाचे सहकार्य केले असे मनोगतात सांगितले, प्राथमिक शाळा स्तरावर गुरूवर्य आवडते शिक्षक नरेश सावंत सर , मेघश्याम लोनशिकर सर, राजेश खटके सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत महाडीक यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश शिगवण यांनी केले.
Comments
Post a Comment