पनवेलचे पत्रकार शंकर वायदंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव



 पनवेलचे पत्रकार शंकर वायदंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव

पनवेल - नवीन पनवेल भीम महोत्सव २०२३ दि. १६ एप्रिल रोजी  आयोजक नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्ध विहार, नवीन पनवेल रायगड यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शंकर वायदंडे यांना मा. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. 

शंकर वायदंडे पत्रकार क्षेत्रात कार्य करत असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज या महापुरुषांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. तसेच समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण करून समाजहित जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते स्वत: झोपडपट्टी राहत असून झोपडपट्टी सुधारणा होईल, याचा विचार करीत कार्यक्रम राबवत असतात. पनवेलमधील सर्व सामाज घटकांना न्याय देण्याचे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून लोकांसाठी वेळोवेळी मदतीला जात आहेत. त्यांच्या या कार्याची दखत घेत बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार नवीन पनवेल रायगड यांच्या माध्यमातून आयोजक मा. नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी शंकर वायदंडे यांना परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर व हजारो भिम अनुयायी उपस्थित होते. या समाज भूषण पुरस्काराबद्दल सर्वच स्थरातून पत्रकार शंकर वायदंडे यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर