सी.के. टी कॉलेजमध्ये बँकिंग भरती परीक्षेच्या उन्हाळी वर्गासाठी प्रवेश सुरु
सी.के. टी कॉलेजमध्ये बँकिंग भरती परीक्षेच्या उन्हाळी वर्गासाठी प्रवेश सुरु
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सी.के.टी वाणिज्य, कला ,विज्ञान, महाविद्यालयातील डॉ.सी. डी देशमुख (बँकिंग)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील नोकर भरतीच्या पूर्वतयारीसाठी दिनांक 9 मे ते 9 जून 2023 या कलावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका तसेच विविध प्रकारच्या इतर वित्तीय संस्थांमधील प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क, असिस्टंट मॅनेजर, असोसिएट, एल.आय. सी. ऑफिसर इत्यादी पदाच्या नोकर भरतीसाठी *इन्स्टिट्यूट फॉर बैंकिंग पर्सनेल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस द्वारे नोकर भरतीच्या परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार आता राज्यातील सर्व नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील सर्व प्रकारची नोकर भरती देखील *आयबीपीएस च्या धर्तीवर होणार आहेत. त्यामुळे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील नोकर भरतीच्या या सर्व परीक्षांची योग्य तयारी करून घेण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्गात गणितीय व सांख्यिकीय अभियोग्यता, बुद्धिमापन, तार्किक योग्यता, इंग्रजी भाषा व बँकिंगची तयारी करून घेतली जाणार आहे. याकरिता तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आलेली असून सदर प्रशिक्षण वर्गामध्ये बारावी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि *पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे तसेच पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवेशघेऊ शकतात. हा मार्गदर्शन वर्ग सर्वांसाठी खुला असून इतर महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील प्रवेश घेऊ शकणार आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालय व अभ्यासिकेसह प्रवेश आणि फक्त लेक्चर्स करिता प्रवेश असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. सदर मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील व बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक विजय शितोळे आणि संजय हिरेमठ यांनी सदर मार्गदर्शन वर्गास प्रवेशघेऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरून 5 मे 2023 अखेर आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे https://docs.google.com/
अधिक माहिती साठी 92235 55779, 9833177551, 9867498167 या क्रमांकावर संपर्क साधावा
Comments
Post a Comment