फळांचा राजा असलेला आंबा लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आवडीचे फळ आहे. सध्याच्या मोसमात आंब्यांची मोठी रेलचेल आणि मागणी आहे. त्या अनुषंगाने मोहोपाडा रसायनी परिसरात विविध फळांसाठी प्रसिद्ध असलेले फळविक्रेता मंगेश घाडगे यांच्या दुकानात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात फळे मिळत आहेत, त्यामुळे दुकानात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.



 मे महिना आणि आंबा असं समीकरणचं आहे. सध्या आंब्याचा सीजन आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात.  आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. आंब्याचा मोसम जेमतेम दोन तीन महिन्यांचा. पण तेवढ्या काळात आपल्या जिभेचे पुरवता येतील तेवढे चोचले पुरवून हे फळ साक्षात अमृताची अनुभूती देत असतं… ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ सर्वानी आपल्या लहानपणी आंब्याचे हे गाणे नक्की ऐकले असेल. आंबा या नावातच एक वेगळे माधुर्य आहे. ‘आम्र’ या संस्कृत नावात तर मस्त राजेशाही थाट आहे. उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत. चव, रंग, रूप प्रत्येक बाबतीत आपला आब राखून असलेले फळ.    फळांचा राजा असलेला आंबा लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आवडीचे फळ आहे. सध्याच्या मोसमात आंब्यांची मोठी रेलचेल आणि मागणी आहे. त्या अनुषंगाने मोहोपाडा रसायनी परिसरात विविध फळांसाठी प्रसिद्ध असलेले फळविक्रेता मंगेश घाडगे यांच्या दुकानात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात फळे मिळत आहेत, त्यामुळे दुकानात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर