कृष्णा काेबनाक श्रीवर्धन मतदार संघात िजंकणार... हाेणार अामदार राज्यात लवकरच कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन करणार




कृष्णा काेबनाक श्रीवर्धन मतदार संघात िजंकणार... हाेणार अामदार

राज्यात लवकरच  कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन  करणार

श्रीवर्धन :: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई  या मातृसंस्थेचे अध्यक्ष भूषणजी बरे साहेब यांच्या अध्यक्षतेख़ाली रविवार दिनांक ९-४-२०२३ रोज़ी सकाळी १० वाजता परळ, मुंबई  येथील संघ कार्यालय येथे बैठक  घेण्यात आली. याबैठकीत  सात जिल्ह्य़ातील  प्रमुख  समाज  पदाधिकारी, तालुका शाखा अध्यक्ष , संलग्न मंडळांचे पदाधिकारी , संघ प्रतिनिधि , कार्यकारिणी सदस्य  आणि संघ पदाधिकारी यांनी सदर विषयावर सविस्तर  चर्चा केली.सर्व  मान्यवरांकडून  वर्तविले की, आपला समाज हा बहुसंखेने असून आपण राजकीय  क्षेत्रात अजूनही वंचित  आहोत,ही शोकांतिका आहे. आपला हक्काचा असा एकही लोकप्रतिनिधी तळ कोकणातून  मागील  ३० वर्ष  राज्याच्या विधीमंडळात  निवडून  गेला नाही ! शासन दरबारी कुणबी समाज्याचे अनेक प्रश्न वर्षानूवर्ष आज ही प्रलंबित आहेत.! कुणबी समाज्याचे प्रलंबित प्रश्न कोणत्याही सरकारने सोडविले नाहित. यासाठी कुणबी समाज्याचे स्वतःचे प्रतिनिधि विधान मंडळात गेलेच पाहिजेत . हे सत्य वास्तव आहे . म्हणून  आपण आपल्या हक्काचा राजकीय पक्ष स्थापन  करून  आपले राजकीय  हक्क  अधिकार  प्राप्त  करण्यासाठी समाज  संघटित  करून आजच्या सभेमधे आलेल्या सूचनांचा  योग्य तो अंतरभाव करुण तसेच समान कीमान कार्यक्रम आणि व्यापक दृष्टिकोण ठेऊन अतिशय संवेदनशील राहून , एकमेकांवर टीका- टिपण्णी न करता - महाराष्ट्राच्या काना- कोप-यात पोहचून अत्यंत सावधगिरी बाळगूण प्रत्येक घटकाला जवळ करुण महाराष्ट्र राज्यात राजकीय  पक्ष स्थापन  करण्याबाबत  एकमुखी निर्णय घेण्यात आले आहे. 

या बैठकीत अनेक  मान्यवरांनी व विविध  राजकीय  पक्षात  काम  करीत  असलेल्या  सर्व  समाज  बांधवानी मनोगत  व्यक्त केले. राजकीय  संघटन  समिती अध्यक्ष अशोकदादा वालम  यांनी सर्वानाच  विश्वास  देऊन यशस्वी केलेल्या कामांची अनेक ऊदाहरणे देऊन सभागृहाला आस्वाशीत केले. आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहचवीताना,  राजकीय पक्ष स्थापन करत असताना समाज  संघटनेला कोणत्याही परिस्थितीत  वेठीस न धरता , फ़क्त मातृसंस्थेने आम्हाला सदैव  आशिर्वाद  व शुभेच्छा द्याव्यात . असे आवाहन  केले आहे. लवकरच  या पक्षाचे ध्येय धोरण , राजकीय घटना आणि महत्वाच्या बाबी, व पक्षाचे नाव जाहीर  करण्यात  येईल  असे सांगण्यात  आले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर