आमदार प्रशांत ठाकूर आणि भरत गोगावले होणार मंत्री; रायगड जिल्ह्याचा होईल आता सुपर फास्ट विकास...




आमदार प्रशांत ठाकूर आणि भरत गोगावले होणार मंत्री; रायगड जिल्ह्याचा होईल आता सुपर फास्ट विकास...

पनवेल (रायगड मत/जितेंद्र नटे)

रायगड जिल्ह्याला 2 मंत्री पदे मिळणार आहेत. महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर होणार मंत्री. पालकमंत्री आता रायगडचा होणार त्यामुळे रायगडचा विकास हा सुपरफास्ट होईल यात शंकाच नाही. दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असा दुहेरी विकास साधण्यासाठी एक भाजपचा आणि शिवसेनेचा असा दुहेरी संगम साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, रायगड जिल्ह्यात सध्या 3 भाजपचे तर 3 शिवसेनेचे आमदार आहेत. म्हणजे खासदारकी साठी येथे नक्कीच युतीचा उमेदवार उभा जिंकू।शकतो. त्याची तयारी आता पासूनच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेली अनेक महिने मंत्री मंडळाचा रखडलेला विस्तार रखडला होता. अखेर या महिन्याच्या मंत्री पद वाटण्यात येतील. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या महाराष्ट्र दाै-यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केल्याचे खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यावर शिंदे - फडणवीस सरकार लाेकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार अाहे.

राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर निकाल अाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार अाहे. भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवाद काँग्रेस आणि काॅंग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले हाेते. या प्रयत्नांना यश अाले तर मंत्रीमंडळात काही जागा येणा-यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये हाेती. मात्र, अाता भाजप-शिवसेना अापल्या जागा भरणार अाहे. मे अखेरीस हा मंत्री मंडळ विस्तार हाेऊ शकताे.

या आमदारांची लागणार मंत्री पदी वर्णी:

#भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल पुण्यातील अामदार माधुरी मिसाळ, मुरबाडचे अामदार किसन कथाेरे, राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, याेगेश सागर अशा चेह-यांनी संधी मिळू शकते.

# शिंदे गटातून संजय शिरसाट, याेगेश कदम, भरत गाेगावले, प्रकाश अाबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकरवकर यांची नावे चर्चेत अाहेत.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर