मौजे गौळवाडी ( निगडी )येथे भगवान श्रीकृष्ण मंदिराचा २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
*मौजे गौळवाडी ( निगडी )येथे भगवान श्रीकृष्ण मंदिराचा २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न*
प्रतिनिधी/संदीप लाड
श्रीवर्धन तालुक्यातील
गौळवाडी (निगडी )येथे यादव गवळी समाज स्थानिक ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ ,श्री समर्थ महिला मंडळ, (रजि)यांच्या वतीने श्री कृष्ण मंदिराचा २० वा वर्धापन दिन व महाराष्ट्र यादव ट्रस्ट श्रीवर्धन शाखेचे २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा,महाआरती,
महाप्रसाद, ज्येष्ठ समाज सेवकांचा ,व मान्यवरांचा सत्कार , विद्यार्थ्यांचा गुणगौरव, मनोगत, महिलांचा हळदी कुंकू, संगीत खुर्ची, लहान मुलां मुलींची डान्स स्पर्धा , असे विविध कार्यक्रम पार पडले
सदर कार्यक्रमात मुरुड चिकणी येथील MBBS डॉक्टर झालेली कुमारी सीमा सुभाष खेडेकर व गौलवाडी येथील LLB वकील झालेले कुमार निश्चय संजय महाडिक आणि मुलीसाठी किडनी दान केलेल्या नागलोली येथील समाजसेविका शुभांगी महाडिक यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी कार्यक्रमाला संजय रिकामे, नागेश साबळे,गणेश दिवेकर,मोहन दिवेकर, संतोष मिरगळ,गणेश साबळे, रुपेश महाडिक,सुनील तांबडे,संजय महाडिक,मोहन लाड,दिगंबर तांबडे,विनोद महाडिक,मयूर धुमाळ,सचिन साबळे,नामदेव साबळे,सुयोग साबळे, राजेंद्र दिवेकर,रवी दिवेकर, माधवी लाड ,माधुरी महाडिक,सरस्वती महाडिक, यांच्यासह असंख्य समाज बांधव नवतरुण मित्र मंडळ उपस्थित होते
Comments
Post a Comment