श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांचा विकासाचा झंझावात
आमदार आदिती तटकरे यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून उभारण्यात आलेल्या कुणबीवाडी सामाजिक सभागृहाचे केले उद्घाटन
म्हसला : मौजे पांगलोळी, कुणबीवाडी ता. म्हसळा येथे माझ्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधी अंतर्गत येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कुणबीवाडी सामाजिक सभागृहाचे उद्घाटन तसेच मौजे आमशेत ता. म्हसळा येथे मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत येथील स्मशान शेड बांधणे व सुशोभीकरण या कामाचे उद्घाटन श्रीवर्धन मतदार संघाच्या अामदार अादिती तटकरे यांनी आले. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी, सर्व ग्रामस्थ मंडळी, मंडळ महिला, मुंबई मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकासकामे लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देऊन यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे असे यावेली अामदारांनी सांगितले.मौजे फळसप बौद्धवाडी येते रौप्य महोत्सवी वर्ष तसेच संयुक्त जयंती निमित अामदार आदिती तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा
म्हसळा : मौजे फळसप बौद्धवाडी ता.म्हसळा येथे फळसप बौद्धजन सेवा संघ,संघ मित्र महिला मंडळ,फळसप नवतरुण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने रौप्य महोत्सवी वर्ष आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी माझ्यासह,सर्व ग्रामस्थ मंडळी,मंडळ महिला,मुंबई मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना रौप्य महोत्सवी वर्ष तसेच संयुक्त जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
तळा तालुका येथे सांस्कृतिक कार्यक्रमास अा. अादिती तटकरे यांची उपस्थिती
तळा: तालुक्यातील मौजे गौळवाडी तसेच म्हसळा तालुक्यातील मौजे कोलवट, पाष्टी,मांदाटणे, आंबेत नवीवाडी, येथे श्री. सत्यनारायण महापूजा, पालखी सोहळा व हळदीकुंकू समारंभ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी माझ्यासह,सर्व ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ,मुंबई मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच गावांतील मंडळांच्या वतीने भजन, कीर्तन सेवा, जागर सेवा,विद्यार्थी गुणगौरव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने त्यांच्या आनंदात सहभाग होत उपस्थित सर्वांचे कौतुक करित शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment