गवळी समाज म्हसळा शाखेचा १४ मे राेजी २५ वा वर्धापन दिन साेहळ्यास पास्टी-म्हसळा येथे हजाराेंच्या संख्येने उपस्थित रहा - शांताराम गायकर
गवळी समाज म्हसळा शाखेचा १४ मे राेजी २५ वा वर्धापन दिन साेहळ्यास पास्टी-म्हसळा येथे हजाराेंच्या संख्येने उपस्थित रहा - शांताराम गायकर
म्हसळा (प्रतिनिधी) : म्हसळा तालुक्यातील दुर्गम खेडेगावात गवळी समाज हा बहुतांशी प्रमाणात राहत आहे. येथील अनेक लोक हि मुंबईवर अवलंबून असतात. गरीब आणि गरजू अश्या या गवळी समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट हि शिखर संस्था कार्यरत आहे. अनेक तालुक्यात अनेक शाखा या ट्रस्टच्या आहेत. मात्र म्हसळा तालुक्यात म्हणावा तसा विकास या समाजाचा झालेला दिसत नाही. येथील चाकरमानी हे मुंबईत नोकरी करीत कसे तरी आपले कुटुंबाचा उदर्निवाह चालवत असतात. मात्र तरीही या समाजाकडून अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. समाजासाठी म्हसळा शाखेचे अनेक गवळी समाज कार्यकर्ते हे अहाेरात्र मेहनत करीत झटत असतांना दिसत अाहेत.
अशातच या ट्रस्टच्या म्हसळा शाखेचा २५ वा वर्धापन िदन साहळा हा मु. पास्टी - म्हसळा तालुक्यात येथे हाेत अाहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक अध्यक्ष श्री. रामदास िरकामे हे प्रचंड मेहनत घेत अाहेत. अापल्या लाेकांनी जास्त जास्त सहभागी हाेऊन समाजाच्या भविष्यासाठी एकत्रित यावे यासाठी ती अथक प्रयत्न करीत अाहेत. या शाखेचे मुंबई अध्यक्ष श्री. शांताराम गायकर आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना मुले अनेक लोक मागे गेली, काेराेनानंतर अालेली मरगल झटकण्यासाठी हा कार्यक्रम नवी उभारी मिळवून देईल असे त्यांचे म्हणणे अाहे. जास्तीत जास्त लोकांना जीवन जगण्याची नवी उभारी देण्याचे काम हि संस्था प्रामुख्याने करणार आहे. गवळी समाज हा प्रामाणिक आणि कष्टाळू आहे कुणाच्याही आशेवर न राहता हा समाज मेहनत करून आपले जीवन जगत आहे. अनेक लोकांना सामाजिक, शैक्षणिक मदत ट्रस्ट मार्फत मदत मिळवून देण्याचे कार्य सद्या युध्द पातळीवर सुरु आहे. तुटलेल्या आणि पिचकलेल्या समाजाला नवी संजीवनी देण्याचे महान कार्य आम्हाला करायचे आहे, गवळी समाजाचा िवकास हाच अमुचा ध्यास असे शांताराम गायकर यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक, सामाजिक तासेच शासकीय योजना संधर्भात अजून गवळी समाज मागे राहता कामा नये. त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लवकर दौरे काढून जन जागृती करण्यात येईल. म्हसळा तालुक्यात समाजाची मोठी इमारत असावी असे अनेक लाेकांचे स्वप्न अाहे. त्यासाठीही विशेष प्रयत्न चालू आहेत. समाजातील लोक एकत्र येत नाहीत, सध्याची तरुण पिढीने जर एकत्र आले आणि एकसंघ राहून आपणही या समाजाचे काही देणे लागतो अश्या प्रकारे आम्हाला समाज कार्य करण्यास सहकार्य केले तर नक्कीच समाजात बदल घडायला वेळ लागणार नाही. असे शेवटी जेष्ठ समाजसेवक व महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट चे म्हसळा मुंबई शाखेचे अध्यक्ष शांताराम गायकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment