पनवेलमध्ये स्थापना दिन उत्साहात
पनवेलमध्ये स्थापना दिन उत्साहात
यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. १९८० मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती.भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाले. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.लोकसभेत पक्षाच्या ३०३ जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे १०० खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. स्थापना दिनाच्या अनुषंगाने आज सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
भाजप आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे १४ एप्रिलपर्यंत विशेष सप्ताह म्हणून साजरी करणार आहे. पक्षाने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना यासंबंधी ११ एप्रिलला समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले व १४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व बूथ, मंडल, जिल्हा व राज्य कार्यालयात साजरी करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment