विदेशातून पनवेल मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करा-प्रितम म्हात्रे*
विदेशातून पनवेल मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करा-प्रितम म्हात्रे*
"रुग्ण वाढायच्या अगोदर योग्य त्या उपाययोजना करा"
पनवेल : महाराष्ट्रामध्ये कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंखे नुसार पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांनी मागणी करताना सांगितले आहे की , गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे.कोरोनाचा धोका वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मास्क वापरण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 1.82 टक्के आहे. राज्यात एकूण 3532 सक्रिय रुग्ण होते. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
या अनुषंगाने खबरदारी म्हणून पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच जनजागृती करून नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी विशेष मोहीम राबवावी जेणेकरून भविष्यात पेशंटची संख्या वाढणार नाही आणि कोरोना नंतर पूर्वपदावर आलेले जनजीवन विस्कळीत होणार नाही अशाप्रकारे नियोजन करावे.
*कोट*
विदेशातून येणाऱ्या नागरिकांची नोंद घेऊन त्यांची कोविड चाचणी करणे बंधनकारक करावे जेणेकरून जर ती व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर त्याला त्वरित क्वारंटाईन करता येईल जेणेकरून त्या एका रुग्णामुळे भविष्यात अख्या सोसायटीला त्रास होऊ नये.:-
प्रितम जनार्दन म्हात्रे,(मा. विरोधी पक्षनेता,पनवेल महानगरपालिका.)
Comments
Post a Comment