पिण्याच्या पाण्याची नवीन जोडणी # 'कुस्त्यांचे जंगी सामने' # आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून करंबेली गावातील रस्त्याची आणि पाण्याची समस्या दूर करणार -अरुणशेठ भगत

पिण्याच्या पाण्याची नवीन जोडणी पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पिण्याच्या पाण्याची नवीन जोडणी घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत नवीन १४ इंचाची पाईप लाईन मार्केट यार्ड येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. या पाईप लाइन टाकण्याच्या विकासकामाचे भुमीपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. या नागरिकांना भविष्य काळात पाण्याचा तुटवडा भासू नये या कारीता अमादार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याच्या संदर्भातील अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील मार्केट यार्ड येथे अमृत योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीसाठी एमजेपीकडून नवीन पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने नवीन १४ इंचाची पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु झाले असून या कामाचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते भुपीपूजन झाले. या पाण्याच्या पाईप लाईनमुळे कल्पतरू परीसरात असणाऱ्या अनेक सोसायट्यांना याचा फायदा होणार आहे. या कामाच्या भुपीपूजनावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, पनवेल किसान मोर्चाचे अध्यक्ष रुपेश परदेशी, प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष पवन सोनी, तुषार कापरे, ठेकेदार मनोज खांदेशे, अतुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. --------------------------------------------------------

 'कुस्त्यांचे जंगी सामने' पनवेल (प्रतिनिधी) नितलस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या माध्यमातून 'कुस्त्यांचे जंगी सामने' मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. गावदेवी यात्रे निमीत्त ही स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपनेते एकनाथ देशेकर भाजपचे तालुका सरचिटणीस नितलस तालीमचे वस्ताद डी.बी.म्हात्रे, पनवेल तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाटील, विनोद नाईक, नितलसचे सरपंच संदीप पाटील, माजी सरपंच शरद पावशे, भार्गव सांगडे, उपसरपंच कैलास मढवी, धर्माशेठ पावशे, मारुती पावशे, दत्ता पाटील, गुरुनाथ पावशे, संतोष गोंधळी, रुपेश पावशे, विकास पावशे, साजन पावशे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्यावतीने गावदेवी यात्रे निमीत्त 'कुस्त्यांचे जंगी सामने आयोजीत करण्यात आले होते. या स्पर्धेतील दरम्यान या स्पर्धेतील अंतिम सामना नरेश म्हात्रे विरुद्ध हरेश कराले यांच्यात रंगाल असून हा सामना बरोबरीत संपला. तसेच या स्पर्धेत आमदार प्रशांत ठाकूर यांचे पुत्र अपुर्व ठाकूर याने मैदानावर उतरत सहभाग घेतला होता. अपूर्व याने आज पहिल्यांदा आपल्या जीवनातील कुस्ती खेळाचा श्रीगणेशा केला. आपल्या पहिल्याच कुस्तीत सामने वाल्याशी तगडी झुंज देऊन कुस्ती बरोबरीने सोडवली. मुलं आज मोबाईलमध्ये गुंतत असल्याचे दिसत असताना, कुस्ती सारख्या रांगड्या खेळाची निवड केल्याबद्दल अपूर्व ठाकूर यांचे कौतुक होत आहे. ---------------------------------------------- 

 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून करंबेली गावातील रस्त्याची आणि पाण्याची समस्या दूर करणार -अरुणशेठ भगत पनवेल(प्रतिनिधी) करंबेली गावातील रस्त्याची आणि पाण्याची समस्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिले तसचे विकास कामे करण्याकरीता ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे असे प्रतिपादन करंबेली येथे रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनावेळी केले. पनवेल मतदार संघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मंजुर होऊन ती मार्गी लागत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक निधीतून (८ लाख ५० हजार रुपये) पनवेल तालुक्यातील करंबेली खालचीवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते मंगळवारी झाले. या वेळी भाजपचे ओबीसी सेल अध्यक्ष एकनाथ देशेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, भाजपनेते चांगू चौधरी, बापू चौधरी, मंगेश भगत, जनार्दन भगत, दत्ता भगत, बबन भगत, जोमा भगत, पिंटू म्हात्रे, रविंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मोरबे ते करंबेली पर्यंतच्या रस्त्याचे काम तसेच पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच या करीता ग्रामस्थांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर