आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे ह्यांचा वाढदिवस उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा.



 आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख  महेंद्र थोरवे ह्यांचा वाढदिवस उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा.

उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे ह्यांचा वाढदिवस कर्जत, खालापूर आणि उरण तालुक्यात मोठया उत्साहात साजरा केला गेला.
उरण तालुक्यात त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख  रुपेश पाटील ह्यांनी उरण मधील रानसई कातकरी वाडी येथे आदिवासी बालकांसाठी शालेपयोगी साहित्य आणि खाउचे वाटप केले.तसेच दैनंदिन गरजेसाठी आधार कार्ड नोंदणी पॅनकार्ड तसेच रेशन कार्ड ची सध्याची असलेली गरज व त्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती बाबत जनजागृती करून नोंदणी केली. असे विविध सामाजिक कार्यक्रम उरण तालुक्यात आयोजित केले गेले . शिवसेना शाखा, जसखार तालुका उरण यांच्या उत्साही सहभागाने सदर कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
       सदर कार्यक्रम रुपेश पाटील ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ह्याप्रसंगी उरण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी विभागप्रमुख गणेश घरत, शाखाप्रमुख अमित ठाकूर, ग्रामपंचायत जसखार उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे, सदस्या हेमलता भालचंद्र ठाकुर, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, हर्षल ठाकूर, तेजस घरत आदी शिवसैनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महेश कातकरी माजी उपसरपंच, सुनील जोशी, नामदेव ठाकूर हे सामाजिक कार्यकर्ते आणि विंधने ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सदर कार्यक्रमास  उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर