श्रीसंत तुकाराम महाराज रौप्यमहोत्सव बीज उत्साहात साजरी
श्रीसंत तुकाराम महाराज रौप्यमहोत्सव बीज उत्साहात साजरी
श्रीवर्धन सोपान निंबरे; श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ मुंबई मंडळ व गणेश क्रिकेट मंडळ गालसुरे (कुणबी वाडी) यांचे सौजन्याने श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव व बीजचे औचित्य साधून श्री सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेली पंचिविस वर्ष तुकाराम महाराज बीज गालसुरे मध्ये साजरी केली जाते. यातून तालुक्यातील समाजामध्ये संत तुकाराम महाराजांचे विचार, शिकवण व परमेश्वराची भक्त्ती घडावी हा उद्धिष्ट घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला समाज तालुका अध्यक्ष रत्नकांत लांबाडे, उपाध्यक्ष बबन चाचले, जेष्ठ नारायण भोसले, लसू भाये, सीताराम साळवी, माजी सभापती बाबुराव चोरगे, मुंबई माजी अध्यक्ष बाळकृष्ण सोलकर, दशरथ कातकर, उपसरपंच दिलीप सालदुरकर,भांडारी समाज विठोबा देवकर, बौद्ध, कुंभार, समाजाचे अध्यक्ष तसेच, हरीचंद्र मलेकर, संदीप भात्रे तसेच तालुक्यातुन कुणबी समाज प्रमूख अध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्र गोरीवले यांनी केले तसेच कार्यक्रम उत्तमरीत्या होण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, महिला, मुंबई व गणेश क्रिकेट मंडळ यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी सातवाजता ध्वजारोहण व संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी मिरवणूक तर दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आले.
दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन होते.
सायंकाळी चार वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा तर सायंकाळी पाच ते सहा वाजता सुस्वर हरि भजन गालसुरे ग्रामस्थ मंडळ कुणबी वाडी तसेच रात्री आठ ते दहा वा विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आणि
रात्री दहा वा गालसुरे ग्रामस्थ मंडळ आयोजित शाहीर विनोद फटकरे पोशिंदा नमन असे होते
Comments
Post a Comment