रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना 'डि.लिट.' पदवी जाहीर; जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून होणार गौरव
रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना 'डि.लिट.' पदवी जाहीर; जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून होणार गौरव
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगड भूषण आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्यावतीने मानाची डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असून रविवार दिनांक ५ मार्च २०२३ सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली आयोजित समारंभात 'डी.लिट' ही मानाची पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना या पुर्वी युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठ, फ्रान्सच्या डि. लिट. पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यातील योगदाना बद्दल सचिनदादा धर्माधिकारी यांना जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असून विद्यापिठाचे कुलपती डॉ. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र विद्यापिठाच्या शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी डॉ. सचिन धर्माधिकारी यांना दिले. या पूर्वी विद्यापिठाने माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, अभिनेत्री हेमामालिनी, भगतसिंग कोश्यारी, डॉ. डि. वाय. पाटील, जनरल जोगींदर जसविंदरसिंग, डॉ. कमला बेनिवाल, डॉ. एस. सी. जमीर,बनवारीलाल जोशी, केशरीनाथ त्रिपाठी आदींसह २० राज्यपाल तसेच अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले आहे.
सचिनदादा धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. हे प्रतिष्ठान तालुक्यातील रेवदंडा येथून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान सातत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारत आलेले आहे.
- प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम -
वृक्षारोपण आणि संगोपन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप, रक्तदान शिबीरे, निःशुल्क आरोग्य निदान आणि उपचार, आरोग्य विषयक जनजागृती शिबीरे. पाणपोयांची निर्मिती, बस थांब्यांवर निवार्यांची निर्मिती, कालवे, सरोवरे, नद्या आणि धरणांमधील गाळांचा उपसा करणे, स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायांसाठी मार्गदर्शन शिबीरे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शारीरिकदृष्टया अक्षम आणि मुक-बधीर व्यक्तींना आवश्यक अवयव आणि उपकरणांचे वाटप आदी प्रकल्प आणि उपक्रमांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment