ग्रामपंचायत कुडगावमध्ये भ्रष्टाचार; चार ग्रामसेवकांचे निलंबन

 ग्रामपंचायत कुडगावमध्ये भ्रष्टाचार; चार ग्रामसेवकांचे निलंबन.


श्रीवर्धन कोलमांडला / सोपान निंबरे

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन कुडगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांनी केलेला भ्रष्टाचार उघड झाले असून यामध्ये चार ग्रामसेवक निलंबित तर संबंधित सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्यात आली असून संबंधित कनिष्ठ सहाय्यक तसेच विस्तार अधिकारी यांची खाते निहाय चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आले आहेत.

 ग्रामपंचायतमधील होणाऱ्या भ्रष्टाचारांपैकी ही जिल्हा स्तरावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

प्राप्त माहितीनुसार या गैरव्यवहार प्रकरणी कुडगाव ग्रामस्थ निलेश मोहन पवार यांनी विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार सन २००९ ते २०१६ कालावधीतील कुडगाव ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारा बाबत सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी सादर केला होता. या अहवाला नुसार विभागीय आयुक्त यांनी रायगड जिल्हा परिषदेला नियमोचित कारवाही करण्याचे आदेश पारित केले होते. परंतु जिल्हा परिषदे कडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. विभागीय चौकशी होऊन जवळपास अडीच वर्षे उलटूनही या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदे कडून कोणती ही कारवाईचे संकेत दिसत नव्हते. म्हणून या संदर्भातील निलेश पवार यांच्याकडून लोकआयुक्त कार्यालयाला दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार दाखल करण्यात आली. त्यावर माननीय लोक आयुक्त कार्यालयाकडून रायगड जिल्हा परिषदेला माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनावणी घेण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

त्या अनुषंगाने दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. यावेळी माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सुनावणीत उपायुक्त रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीवर्धन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तक्रारदार निलेश पवार हे उपस्थित होते. 

यावेळी कुडगाव ग्रामपंचायतच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेने ग्राम पंचायतीचे तात्कालीन ग्रामसेवक संजय श्रीवर्धनकर, रवींद्र सोनवणे, यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तसेच त्यांच्यावर खाते ज्ञानपण चौकशी बजावण्यात आली असून दोन वेतन वाड कायम स्वरूपी थांबवण्यात आले आहेत. तात्कालीन ग्रामसेवक अभिषेक मकु, आणि एल. एच. बेंडूक, यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांच्यावर खाते ज्ञानपण चौकशी बसवण्यात आली असून कायम स्वरूपी वेतन वाढ थांबवण्यात आली आहे. जिल्हा परिषदे कडून या प्रकरणात तात्कालीन सरपंच दगडू काबिलकर, नागुबाई वाघमारे यांच्यावर भ्रष्टाचाराची रक्कम निश्चित करून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विस्तार अधिकारी किशोर नागे आणि तात्कालीन विस्तार अधिकारी चिमाजी हंबीर यांची खाते निहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत त्याच प्रमाणे रायगड जिल्हा परिषदअलिबाग मुख्य कार्यालय ग्रामपंचायत विभागातील तात्कालीन कनिष्ठ सहाय्यक कैलास चव्हाण वरिष्ठ सहाय्यक प्रसाद ठाकरे यांच्या खाते निहाय चौकशीचे आदेशही दिले आहेत. तसेच तात्कालीन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अंजली वर्तक यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तक्रारदार निलेश पवार यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या तात्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शितल पुंड यांना कारणे दाखवा नोटीसही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावली आहे.


कनिष्ठ सहाय्यक विस्तार अधिकारी यांची खाते निहाय चौकशी


संबंधित अधिकारी यांना शिस्तभंग कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस


तात्कालीन सरपंच यांच्यावर भ्रष्टाचार रक्कम निश्चित करून वसुली करण्याचे आदेश

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर