भाजपा, सांस्कृतिक सेल तर्फे आयोजित "माय बोली साजिरी" अभिवाचनात्मक आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध 


भाजपा सांस्कृतिक सेल तर्फे आयोजित "माय बोली साजिरी" अभिवाचनात्मक आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध 


पनवेल(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्याने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगरपालिकेच्या सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा तर्फे पार पडलेल्या 'माय बोली साजिरी- मराठी मनाचा कॅनव्हास' हा संस्कृतीवर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोखले सभागृहामध्ये पनवेलकर रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती.
 अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, खाद्य संस्कृती, पेहेराव संस्कृती, शस्त्रास्त्र संस्कृती हे व असे अनेक विषय ह्या अभिवाचनात्मक कार्यक्रमामध्ये मांडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांना वंदन करत दीपप्रज्वलनाने झाली. 
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजपा सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सांगितले की, पनवेलमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि त्याला पनवेलकरांनी उदंड  प्रतिसाद दिला नाही असे कधीच घडले नाही. त्यामुळे यामधून पनवेलकरांसाठी मराठी संस्कृती आणि नाट्य संस्कृती हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे समजून येते. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रम हे पनवेल मध्ये घेतले जातात आणि पनवेलकर रसिक प्रेक्षक हे सातत्याने भरभरून अशी उपस्थिती लावत आम्हाला आशीर्वाद देत असतात, असेही पटवर्धन यांनी अधोरेखित केले. 
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गौरव गीताने झाली व त्यानंतर स्वा.  सावरकरांचे अजरामर असे गीत जयोस्तुते चे सादरीकरण झाले.  "माय बोली साजिरी" कार्यक्रमाच्या लेखक, दिग्दर्शक, निमार्त्या - मेघा विश्वास ह्यांनी कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने केली. त्यांचे सहकलाकार समीर सुमन, तपस्या नेवे, अमेय रानडे, मेघा विश्वास, रुपेश गांधी यांनी उत्तम साथ दिली. पनवेलमध्ये प्रथमच असा आगळा वेगळा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाला भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, राजश्री वावेकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, अंजली इनामदार, सुहासिनी केकाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी भाजपा सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जिल्हा सह संयोजक गणेश जगताप, सांस्कृतिक सेल पनवेल शहर अध्यक्ष निखिल गोरे, संजीव कुलकर्णी, अमोल खेर, रोहित पाटील, श्रेयस वाणी, हर्षल शिंदे, आदित्य उपाध्ये, वैभव बुवा, नुतन पाटील यांनी विशेष मेहनत घेलती.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर