आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन
- Get link
- X
- Other Apps
आमदार महेश बालदी यांच्या मार्फत आदिवासी बांधवाना मथुरा अयोध्या काशी तीर्थ स्थळाचे दर्शन
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण
आमदार महेश बालदी सुद्धा यात्रेकरूंसोबत यात्रेला
पनवेल(हरेश साठे) आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील १२५० आदिवासी बांधवांना २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मथुरा अयोध्या काशी या तीर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरूंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, मुकीद काझी, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, कामोठे संपर्क प्रमुख विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, भाताचे सरपंच तानाजी पाटील, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, रेल्वे पोलीस निरीक्षक सीताराम राणा, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, मंगेश वाकडीकर, धीरज ओवळेकर, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मुरकुटे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात डोंगर कपारीत आदिवासी बांधव राहत आहेत. आदिवासी समाज रोजंदारी करत आपला उदरनिर्वाह करत असतात, त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना तीर्थस्थळ किंवा सहलीला जाणेही कठीण असते, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे अनेक राजकीय पक्षांनी कधीच लक्ष दिले नाही, मात्र आमदार महेश बालदी यांनी विजय संपादन केल्यावर आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांना दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. आदिवासी वाड्या व पाड्यांवर मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने उरण मतदार संघातील आदिवासीचा आमदार महेश बालदी यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. आपल्या मतदार संघातील आदिवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळ दर्शन व्हावे म्हणून आमदार महेश बालदी यांनी मतदार संघातील आदिवासी बांधवांसाठी मथुरा अयोध्या काशी या तीर्थ यात्रेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे यात्रेसाठी पक्षिय निकष न लावता सर्वांना संधी देण्यात आली आहे. या यात्रेकरूंची व्यवस्था बघण्यासाठी १०० स्वयंसेवक यात्रेकरूंबरोबर आहेत. ही याता पूर्णतः मोफत असून यात्रेच्या कालखंडात चहा नाष्टा जेवण, तसेच राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे आदिवासी समाजात आनंदाची भावना व्यक्त झाली आहे.
चौकट-
आदिवासी वनवासी बांधवांना तीर्थ स्थळाचे दर्शन व्हावे या प्रामाणिक भावनेने आमदार महेश बालदी यांनी हा उपक्रम राबविला आणि विशेष म्हणजे आमदार महेश बालदी स्वतः या यात्रेकरूंसोबत यात्रेत सहभागी झाले आहेत.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment