Posts

Showing posts from December 12, 2022

शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा डोअर टू डोअर प्रचार

 शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा डोअर टू डोअर प्रचार. उरण, (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी आहे.गावच्या सर्वागीण विकासासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिव समर्थ परिवर्तन आघाडी स्थापन करून गावच्या विकासासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे.पागोटे गावात प्रत्येक वार्डात शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा जोरात प्रचार सुरु आहे. हुतात्म्यांना अभिवादन करून सुरु झालेल्या शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या प्रचाराला जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या सरपंच पदासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीचे कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी), वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार सुजित हसुराम तांडेल (निशाणी बॅट ), समृद्धी तुळशीराम तांडेल(निशाणी कपाट ), सतीश ज्ञानेश्वर पाटील (निशाणी ऑटोरिक्षा), तर वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार करिश्मा गणेश पाटील (निशाणी टेबल ), प्राजक्ता हेमंत पाटील (निशाणी बॅट), अधिराज किशोर पाटील (निशाणी कपाट), आणि वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार सोनाली दिनेश भोईर (नि

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Image
 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू उरणः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूरच्या एका खासगी क्लासचे हे सर्व विद्यार्थी आहेत. या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. जखमी विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋतिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मुंबईतील चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी बसने मुंबईकडे परतत असताना, बोरघाटातील मॅजिक पॉइंटजवळ या खासगी बसला अपघात होऊन ती उलटली. यावेळी या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर