Posts

Showing posts from December 11, 2022

‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ- आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

Image
       ‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ-   आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार पनवेल (प्रतिनिधी )रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी कामोठे येथे काढले.         रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा वाढदिवस आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्यास यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रायगड विभाग कामोठे पनवेलच्या वतीने ४० हजार स्क्वेअर फुटी महारांगोळी तसेच खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार दिलीप-वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.   या उपक्रमास

कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले रास्ता रोको आंदोलन; सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात संयुक्त बैठक

Image
कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले रास्ता रोको आंदोलन; सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात संयुक्त बैठक  पनवेल(प्रतिनिधी) आजिवली गावस्थित असलेल्या आयरन माउंटन कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रास्ता रोको आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार उपआयुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाची बैठक होणार असून कामगारांना कामावर पूर्ववत घ्या नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन करण्याचा गर्भित इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.           आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, आप्पा भागीत, राम गोजे, भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, युवा नेते अनिल पाटील,