Posts

Showing posts from December 4, 2022

ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी २०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश; आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी

Image
ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी  २०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश; आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी पनवेल(प्रतिनिधी) ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या बरोबर झालेल्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी करण्यात आली असून त्याचे उदघाटन तीन गावातील शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने झाले. त्यामुळे आता गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे तसेच आदिवासी वाड्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असून २०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. याकामी आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी आला आहे.         लाडीवली येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी सरपंच हरिचंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, राजिपग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुनिल मिटकरी, एम्आयडीसीचे अधिकारी पाचपुंड, सदस्य मनोज पवार, मारुती माठल, सदस्या नुतन पाटील, प्रभावती कार्लेकर, नीता महाडिक, पल्लवी ठाकूर, जयश्री ठोकल, अनिता वाघमारे,तुराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, उपासना गोठळ, चावणे सरपंच सोनावळे,

कोण पटकवणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला विजेत्या एकांकिकेस मिळणार ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक

Image
कोण पटकवणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला विजेत्या एकांकिकेस मिळणार ०१ लाख रुपये  आणि  मानाचा अटल करंडक    पनवेल(हरेश साठे) सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरु असलेल्या नवव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे.   शुक्रवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. त्यामध्ये एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उत्कुष्ट नियोजन, संयोजन, पारितोषिके आणि संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. विनोदी कलाकार ओमकार भोजने हे सुद्धा याच स्पर्धेचा भाग राहिले आहेत. यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनेताच सन्मान त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता प्रेरणादायी ठरला असून राज्यभरातून या करंडकाच

आरोग्य केंद्रावर दररोज संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध करा, मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

  आरोग्य केंद्रावर दररोज संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध करा, मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी नवीन पनवेल : राज्यात गोवरच्या 745 रुग्णांची नोंद झालेली आहे, 12 हजार पेक्षा जास्त संशयित रुग्ण आहेत. गोवरमुळे 18 मुलांचा मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत राबवण्यात आलेल्या उपाययोजना या अजून प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रितम म्हात्रे यांनी काही सूचना केल्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्रावर फक्त बुधवारी सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत आठवड्यातून एकच दिवस लस उपलब्ध असते, त्यामुळे तिथे आलेल्या नागरीकांना माघारी परत जावे लागते. त्यामुळे आरोग्य केंद्रावर दररोज संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध करा अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.         पनवेल महानगरपालिकेमार्फत काही उपाययोजना करताना मा.प्रितम म्हात्रे यांनी सुचविले की, महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावर दररोज आणि संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध कराव्यात. बालकांची जन्म नोंद प्रमाणे पाच वर्षात जेवढे जन्म नोंद झालेले आहे त्या सर्वांना होम व्हिजिट करून प्

खारघरमधील दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात

Image
*खारघरमधील दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात ""मा.विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांची पनवेल महापालिकेकडे मागणी""     पनवेल:       पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या बाहेरही खारघर शहर झपाट्याने वाढले आहे. या गोष्टीचा विचार करून खारघरकरांची मते जाणून दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात. तसेच पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत सोमवारी झालेल्या प्रशासकिय महासभेमध्ये पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दारूबंदीसाठी ठराव घेऊन ज्या  सीमा कायम केलेल्या आहेत त्या ठरावाची मागणी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.           'नो लीकर झोन' म्हणून ओळख असणाऱ्या खारघर शहरात निरसुख पॅलेस नामक एका नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीची परवानगी दिली आहे. या निरसूख पॅलेस बारला विरोध कायम असून राजकीय पक्षांसह विविध स्तरातून विरोध केला जात आहे. या बारविरोधात रविवारी (दि.२७ नोव्हेंबर) सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संघर्ष समितीच्या नियोजनाखाली एकदिवसीय खारघर बंद