खारघर मधील बारला भाजपाचा ठाम विरोध; 'भारतीय जनता पक्ष' पूर्णपणे नागरिकांच्या बाजूने - भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल
खारघर मधील बारला भाजपाचा ठाम विरोध; 'भारतीय जनता पक्ष' पूर्णपणे नागरिकांच्या बाजूने - भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल पनवेल(प्रतिनिधी) खारघर मधील सेक्टर ३० येथे निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलला दारूविक्रीची परवानगी मिळाल्यामुळे लोकांमध्ये जो क्षोभ निर्माण झालेला आहे, त्यामध्ये 'भारतीय जनता पक्ष' हा पूर्णपणे नागरिकांच्या बाजूने असून, खारघर मधील बारला भाजपाचा ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेली आहे, असे प्रतिपादन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले आहे. नो लीकर झोन म्हणून ओळख असणाऱ्या खारघर शहरात निरसुख पॅलेस नामक एका नव्या बार अंड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीची परवानगी दिली आहे, त्याला विरोध दर्शवत ब्रिजेश पटेल यांनी भाजपच्यावतीने ठोस भूमिका मांडली आहे. ब्रिजेश पटेल यांनी या संदर्भात बोलताना म्हंटले आहे कि, खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात असून खारघर शहराची नोंद “नो लिकर झोन” अशी अनेक वर्षांपास