कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश; रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचा स्त्युत्य उपक्रम
कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश; रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचा स्त्युत्य उपक्रम पनवेल(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेल व इनरव्हील क्लब न्युं पनवेल यांनी अनेक स्त्यूत्य उपक्रम राबविले असून त्यातील विशेष भाग म्हणजे दुर्गम भागातील कष्टकरी नगर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वच्यासर्व म्हणजे ७५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व चिक्की वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे अध्यक्ष प्रदीप डावकर यांनी क्लब करीत असलेल्या उपक्रमाची माहिती देवून या शाळेत दिवाळी पूर्वी आरोग्य शिबीर व शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे सांगितले. तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड यांनी पाहुण्यांचे शाल, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आभार मानले. यावेळी रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे सेक्रेटरी ला. पुष्पराज मेडणे, ला. विश्राम एकडे, इनरव्हील न्यु पनवेलच्या ला. सौ. डावकर, शाळा समिती अध्यक्षा सौ. प्राची पाटील, सदस्य सुनिल राठोड, मुख्याध्यापक दिपक कासारे, सहकारी शिक्षक अशोक नेटके, अनिता वाघमारे, शर्मिला उपरे व ग्रामस्थ उपस्थित होते.