पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका*
पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका* *रावे ग्रामपंचायत सरपंचावर कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई* पेण(प्रतिनिधी): पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांतील गैव्यवहार तसेच ग्रामनिधी, ग्राम पाणीपुरवठा निधी, ग्रामपंचायतीच्या नावे मिळणाऱ्या इतर रक्कमा तसेच शासकीय आणि आर्थिक अनियमितपणा असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम(1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) चे कलम 57(3) नुसार कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रावे ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या नाशिकेत पाटील यांना आदेश देत त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे. त्यामुळे पेण तालुक्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे. पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायतीमध्ये एकूण 13 सदस्यीय संख्याबळ असून यामध्ये भाजपाचे निर्विवाद स्पष्ट बहुमत आहे, पण याच ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे, त्यातच पक्षातील अंतर्गत कलह आणि पक्षश्रेष्ठींचा दुर्लक्षितपणा, यामुळे अखेर सरपंच संध्या पाटील यांना आपले सरपंचपद जाण्याची नामुष्की आली आहे. ग्रामपंचा