महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' कार्यक्रम संपन्न
http:// पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नावडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, जिल्हा सदस्य पवन भोईर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर ठाकूर, जेष्ठ नेते रवींद्र खानावकर, नावडे शहर अध्यक्ष मदन खानावकर, उत्तर रायगड युवा मोर्चा अध्यक्ष मयूरेश नेतकर, पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, जितेंद्र काटकर, युवा नेता महेश प