महाराष्ट्र दिनी पनवेलमध्ये अवतरणार परंपरा महाराष्ट्राची "जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे कलारसिकांना कार्यक्रमाची मेजवानी"
महाराष्ट्र दिनी पनवेलमध्ये अवतरणार परंपरा महाराष्ट्राची "जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे कलारसिकांना कार्यक्रमाची मेजवानी" पनवेल : जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि सरगम संगीत अकॅडमी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल मधील हौशी कलाकारांनी एकत्र येऊन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये "परंपरा महाराष्ट्राची" या संगीतमय सुरांची मेजवानी ठेऊन पनवेल करांसाठी एक आगळी वेगळी भेट देण्यात येणार आहे. या कार्यक्रमा संदर्भात माहिती देताना सरगम संगीत अकॅडमी चे श्री नरेश पाटील यांनी सांगितले पनवेलमधील विविध क्षेत्रातील मग ते राजकारण, वैद्यकीय क्षेत्र अभियंता क्षेत्र गृहिणी शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हौशी कलाकारांना एकत्र घेऊन आम्ही आमच्या सरगम संगीत अकॅडमी च्या माध्यमातून पनवेल करांसाठी महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा मराठमोळा कार्यक्रम परंपरा महाराष्ट्राची हा करू इच्छितो ही संकल्पना आम्ही विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडे मांडली. या कार्यक्रमाला नृत्य दिग्दर्शन सुद्धा