कोण पटकवणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला विजेत्या एकांकिकेस मिळणार ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक
कोण पटकवणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला
विजेत्या एकांकिकेस मिळणार ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक
पनवेल(हरेश साठे) सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरु असलेल्या नवव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे.
शुक्रवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. त्यामध्ये एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उत्कुष्ट नियोजन, संयोजन, पारितोषिके आणि संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. विनोदी कलाकार ओमकार भोजने हे सुद्धा याच स्पर्धेचा भाग राहिले आहेत. यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनेताच सन्मान त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता प्रेरणादायी ठरला असून राज्यभरातून या करंडकाचे तोंड भरून कौतुक होत आहे.
या राज्यस्तरीय अटल करंडक एकां
नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे. अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७५ हजार रुपये रक्कम स्वरूपात पारितोषिके असून पनवेल मधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी ह्यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पारितोषिक वितरणाच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत डोक्यात गेलंय (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय- ठाणे), फ्लाइंग राणी- (कलामंथन- ठाणे ), लपंडाव (डॉ. पिल्लई कॉलेज- पनवेल), टिनीटस- (कलरफुल माँक- मुंबई), तुंबई (सी. के. ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय- पनवेल), डोन्ट क्विट- (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स- मुंबई), काहीतरी अडकलंय- (गुरु नानक खालसा स्वायत्त्य महाविद्यालय- मुंबई) या उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
Comments
Post a Comment