आरोग्य केंद्रावर दररोज संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध करा, मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी


 आरोग्य केंद्रावर दररोज संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध करा, मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

नवीन पनवेल : राज्यात गोवरच्या 745 रुग्णांची नोंद झालेली आहे, 12 हजार पेक्षा जास्त संशयित रुग्ण आहेत. गोवरमुळे 18 मुलांचा मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत राबवण्यात आलेल्या उपाययोजना या अजून प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रितम म्हात्रे यांनी काही सूचना केल्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्रावर फक्त बुधवारी सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत आठवड्यातून एकच दिवस लस उपलब्ध असते, त्यामुळे तिथे आलेल्या नागरीकांना माघारी परत जावे लागते. त्यामुळे आरोग्य केंद्रावर दररोज संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध करा अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे. 
       पनवेल महानगरपालिकेमार्फत काही उपाययोजना करताना मा.प्रितम म्हात्रे यांनी सुचविले की, महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावर दररोज आणि संपूर्ण वेळ गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध कराव्यात. बालकांची जन्म नोंद प्रमाणे पाच वर्षात जेवढे जन्म नोंद झालेले आहे त्या सर्वांना होम व्हिजिट करून प्रकृतीची विचारपूस करणे. त्यापैकी कोणी डोस घेतले आहेत का ते चेक करून नसेल घेतलं तर देणे. ग्रामीण भागात, आदिवासी विभागात, तसेच बैठी घरांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. पालकांमध्ये या विषयात माहिती मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील सर्व शाळांमध्ये या आजारासंदर्भात जनजागृतीचे बॅनर लावणेसाठी शाळांना कंपल्सरी सांगणे. गोवरचे रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये लसीकरणाचे कॅम्प राबवणे. आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये संपूर्ण दिवस लस उपलब्ध राहील अशा प्रकारची व्यवस्था करणे जेणेकरून कामावर जाणाऱ्या पालकांना सोयीचे पडेल. 

    
  पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लहान मुलांच्या डॉक्टरांची एक दक्षता कमिटी नेमून भविष्यात सदर आजाराचे रुग्ण शून्य राहतील यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा:- प्रितम म्हात्रे(मा. विरोधी पक्षनेते, प.म.पा.)

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर