मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू



उरणः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूरच्या एका खासगी क्लासचे हे सर्व विद्यार्थी आहेत. या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. जखमी विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऋतिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मुंबईतील चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी बसने मुंबईकडे परतत असताना, बोरघाटातील मॅजिक पॉइंटजवळ या खासगी बसला अपघात होऊन ती उलटली.

यावेळी या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर अन्य अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर