पनवेलमध्ये वास्तू हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने सुरू केली नवीन शाखा
पनवेल(प्रतिनिधी) देशातील अग्रगण्य परवडणाऱ्या वाजवी किंमतीतील गृहनिर्माण वित्तीय कंपन्यांपैकी एकवास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने पनवेलमध्ये नवीन शाखा सुरू करून नवी मुंबई विभागात आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. यासह वास्तू हाऊसिंग फायनान्सचे संपूर्ण भारतात १५७ शाखांचे नेटवर्क असणार आहे.
विशेषत: कोविड नंतरच्या काळात कंपनीला नवी मुंबई प्रदेशात परवडणाऱ्या घरांची मागणी अधिक दिसून आली आहे. त्यामुळे कर्जदारांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनीने नवीन शाखेचे अनावरण केले. मजबूत पायाभूत सुविधा, पुरेशी वाहतूक सेवा, दीर्घकालीन आर्थिक वाढ यासह नवीन पनवेल, खारगर, कामोठे, तळोजा आणि उलवे हा परिसर परवडणाऱ्या घरांसाठी सर्वाधिक आवडीचे स्थान म्हणून उदयास आला आहे. पनवेलमध्ये नवीन शाखा सुरू केल्यामुळेवास्तू पनवेलमधील वंचित ग्राहक वर्गाला जलद कर्जसुविधा प्रदान करेल. हा ग्राहक वर्ग मध्यम विभागातील गृहखरेदी प्राधान्याने करताना दिसत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचा विस्तार आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सारख्या आगामी प्रकल्पांमुळे परवडणाऱ्या घरांची मागणी वाढेल आणि त्यामुळे मागणी आणि वापर, रोजगार, पायाभूत सुविधांमध्ये आणखी वाढ होईल. नवीन शाखा पनवेल, खारघर आणि लगतच्या भागांसह नवी मुंबई परिसरातील लोकांच्या गृहकर्ज, क्रेडिट गरजा पूर्ण करेल.
वास्तू हाऊसिंग फायनान्सचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीसंदीप मेनन म्हणाले, "नवी मुंबईतील अनेक संभाव्य खरेदीदारांसाठी एमएमआरमधील पनवेल परिसरातील भाग हा परवडणाऱ्या घरांसाठी निवडलेल्या सर्वोच्च पर्यायांपैकी एक आहे. घरांसाठीची मागणी आता कोविडपूर्व पातळीच्या जवळ आली असून बर्याच ग्राहकांनी परवडणाऱ्या घरांसाठी पनवेल, नवीन पनवेल, उलवे नोड, द्रोणागिरी नोड या ठिकाणांना पसंत केले आहे. घर खरेदीमधील डिजिटलीकरणासहही तंत्रज्ञान-सक्षम प्रणीत पूर्ण सेवा देणारी शाखा या प्रदेशातील परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करेल." वास्तू हाऊसिंग फायनान्समध्ये पगारदार, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती जसे की दुकानदार, व्यापारी, उत्पादक, छो
Comments
Post a Comment