रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भारत सरकारच्यावतीने 'स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार' ने सन्मानित ••• केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मान पुरस्कारप्राप्त विद्यालय राज्यातील विद्यालयांसाठी अँबेसिडर ठरलेत -केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भारत सरकारच्यावतीने 'स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार' ने सन्मानित
केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मान
पुरस्कारप्राप्त विद्यालय राज्यातील विद्यालयांसाठी अँबेसिडर ठरलेत -केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ
कोट-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत उद्दिष्टाने प्रेरित होऊन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने स्वच्छ विद्यालय हि महत्वपूर्ण अभियानही त्यांनी सुरु केले आणि या मोहिमेतून स्वच्छतेचे महत्व अधिक वाढू लागेल. भारतीय शिक्षण पद्धती आणि परंपरेचा समन्वय साधण्याचा काम या अभियानातून होत आहे. त्यामुळे हा पुरस्कार विद्यालयांसाठी प्रेरणादायी आणि अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे पुरस्कारप्राप्त विद्यालय त्या राज्यातील विद्यालयांसाठी अँबेसिडर ठरले आहेत. - केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार
कोट-
शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि विद्यालय एक मंदिर आहे त्यामुळे ते नेहमी स्वच्छ आणि प्रफुल्लीत वातावरणात असले पाहिजे. त्या अनुषंगाने या उपक्रमाची योजना आखण्यात आली. देशातील लाखो विद्यालयांनी यात सहभाग घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांतून हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे. - केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग
कोट-
शाळेला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जात आहे. त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच शाळेने यशाचे शिखर गाठले आहे. या सन्मानाने विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, त्याबद्दल अभिमान वाटत आहे. - मुख्याध्यापिका राज अलोनी
Comments
Post a Comment