नफा, ना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री केंद्रात 15 टन मालाची विक्री, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

 नफाना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री केंद्रात 15 टन मालाची विक्रीनागरिकांचा मोठा प्रतिसाद

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि जे एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ना नफा, ना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री केंद्रात जवलपास १५ टन मालाची विक्री करण्यात आली आहे . या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सदरचे विक्री केंद्र 18 ते 20 ऑक्टोबर पर्यन्त पनवेलनवीन पनवेलखांदा कॉलनीसेक्टर उलवे येथे उभारण्यात आली होती. 

                महागाईच्या भस्मासुराने देशातील सर्वसामान्य जनतेला गिळंकृत केलं आहे. सर्वसामान्य माणसाची दिवाळी ही एक स्वप्नच बनून राहिली असल्यामुळे सर्वसामान्य माणूस विवंचनेत सापडला आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकी बाळगणाऱ्या प्रीतम म्हात्रे यांनी सदरची संकल्पना राबविली आहे . आणि त्यातून पनवेलकरांनी या संकल्पनेचे स्वागत केले. गतवर्षी देखील टनावरी माल ना नफा, ना तोटा या संकल्पनेवर पनवेलमधील नागरिकांपर्यंत पोहोचला होता. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने फराळासाठी आवश्यक रवासाखरमैदा या वस्तू जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना तर एकाच्या पगारावर घर चालवणे हीच गंभीर गंभीर बाब बनून राहिली आहे. त्यातच दिवाळी हा सण खिशाला कात्री लावून दिवाळे काढणारा असा आख्ययित असलेला सण असलातरी दिवाळी साजरी करणेलक्ष्मीचे घरामध्ये स्वागत करण्यासारखे तसेच विखुरलेल्या घरांना एकत्र आणणे यासाठी दिवाळीला खास महत्व असते. मात्र काही वर्षांमध्ये झालेल्या महागाईने सर्वच जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे ना नफा ना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत विक्री केंद्र उभारण्यात अली होती. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व १५ टन हुन मालाची विक्री करण्यात आली. 

                  दिवाळी सण असल्याने नागरिकांना थोडासा दिलासा म्हणून व दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा या उद्देशाने प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेने दरवर्षीप्रमाणेच जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करून नागरिकांना माफक दरात रवामैदासाखर उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये अर्धा किलो रवाअर्धा किलो मैदा व एक किलो साखर असे 136 रु. किमतीचे अर्धा किलो रवाअर्धा किलो मैदा व एक किलो साखर माफक दर 90 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे पनवेलमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर