आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स "कोकण गौरव" क्रूझ मुंबईहून कोकणाकडे धावणार

 आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स "कोकण गौरव" क्रूझ मुंबईहून कोकणाकडे धावणार


!


 

मुंबई : "कोकण गौरव" हे कोकण प्रदेशातील प्रवासाची पुनर्परिभाषित करणारी पहिली रोपेक्स क्रूझ आहे.ह्या क्रूझची फेरी मुंबई ते काशीद आणि दिघी, रायगड अशी असणार आहे. ही आशियातील हाय-स्पीड क्राफ्ट (HSC2000) पहिली भारतीय रोपॅक्स क्रूझ आहे आणि ही गोवा गौरव क्रूझ प्रा. लि मध्ये बनवली जात आहे.

 

आयआरएस ध्वजाखाली बांधलेले हे अति-आधुनिक, विलासी हाय-स्पीड क्राफ्टचा प्रवासाचा वेळ ५.५0 तासांवरून ३ तासांपेक्षा कमी करेल, ४९ नॉटिकल मैल प्रवास करेल आणि हा या प्रदेशातील वाहतुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग असेल.

 

ही क्रूझ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ह्या क्रूझच्या एका फेरीतुन २६० प्रवासी, २० गाड्या आणि ११ मोटारसायकल घेऊन जाऊ शकतो आणि त्यात A/C, व्यवसाय आणि VIP वर्ग असतील. रसद, प्रवास, पर्यटन आणि मनोरंजनासाठी हे बहुउद्देशीय क्रूझ असेल.


ह्या कार्यक्रमाला श्री. डॉ महेंद्र कल्याणकर, IAS (जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रायगड),श्री. गौतम प्रधान (मुख्य प्रवर्तक संचालक, गौरव क्रूझ प्रायव्हेट लिमिटेड),श्री अरुण नंदा (चेअरमन, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. आणि महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्ट्स (आय) लि.),श्री अमित सैनी, IAS (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड),श्री अमिताभ कुमार, IRS (भारतीय जहाज व जहाज नियामक महासंचालक),श्री आशिष कुमार सिंग, IAS (अतिरिक्त मुख्य सचिव, वाहतूक आणि बंदरे),श्री श्रावण हर्डीकर, IAS (महानिरीक्षक, नोंदणी आणि मुद्रांक नियंत्रक),श्री पुष्कर बेंद्रे (प्रवर्तक संचालक, गौरव क्रूझ प्रा. लि.) या ज्येष्ठ मान्यवरांनी उपस्थिती लावली.

 

 गौतम प्रधान (संचालक, गौरव क्रूसेस प्रायव्हेट लिमिटेड) म्हणाले की, "अनेक आव्हानांना तोंड देत हा प्रकल्प शक्य व्हावा यासाठी त्यांना सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला. ही रोपेक्स इतरांसाठी एक आदर्श ठरेल. कोकणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन घडविण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले, श्रीवर्धनमधील त्यांचे रिसॉर्ट मुंबईहून रोपेक्स मार्गे ३. ३० तासांत आणि जुहूहून हेलिकॉप्टरने ४५ मिनिटांत पोहोचू शकेल.हे भारतातील एकमेव रिसॉर्ट आहे जे वाहतूक जमीन, पाणी आणि हेलिकॉप्टर या तीनही साधनांनी जोडले जाईल.


पुष्कर बेंद्रे (डायरेक्टर स्पीड, गौरव क्रुझेस प्रायव्हेट लिमिटेड) म्हणाले की, "ही हाय रोपेक्स क्राफ्ट (HSC) महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील प्रवासाचा मार्ग बदलेल आणि कोकण प्रदेशातील प्रवासात खूप आवश्यक बदल घडवून आणेल. काशीद आणि दिघीपासून सुरुवात करण्यासाठी ही रोपेक्स महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सेवा देईल."

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर