पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका

पेण तालुक्यात भाजपला मोठा दणका*  

 *रावे ग्रामपंचायत सरपंचावर कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई* 
पेण(प्रतिनिधी): पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांतील गैव्यवहार तसेच ग्रामनिधी, ग्राम पाणीपुरवठा निधी, ग्रामपंचायतीच्या नावे मिळणाऱ्या इतर रक्कमा तसेच शासकीय आणि आर्थिक अनियमितपणा असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम(1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) चे कलम 57(3) नुसार कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रावे ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या नाशिकेत पाटील यांना आदेश देत त्यांचे सरपंचपद  रद्द केले आहे. त्यामुळे पेण तालुक्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे.
         पेण तालुक्यातील रावे ग्रामपंचायतीमध्ये एकूण 13 सदस्यीय संख्याबळ असून यामध्ये भाजपाचे निर्विवाद स्पष्ट बहुमत आहे, पण याच ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे,
त्यातच पक्षातील अंतर्गत कलह आणि पक्षश्रेष्ठींचा दुर्लक्षितपणा, यामुळे अखेर सरपंच संध्या पाटील यांना आपले सरपंचपद जाण्याची नामुष्की आली आहे.             ग्रामपंचायत सदस्या रूतिजा निवृत्ती पाटील आणि इतर सदस्य चंदन पाटील, शुभांगी पाटील, मनीषा पाटील, पांडुरंग पाटील, सरिता पाटील, अपेक्षा पाटील यांनी गटविकास अधिकारी, पेण  यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या गैरकारभाराबद्दल चौकशी करण्याचे निवेदन दिले होते, त्यात त्यांनी ग्रामविकास अधिकारी सुरेश चौकर यांच्या मनमानीपणामुळे  नाराजीही व्यक्त केली होती. या निवेदनाची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर रावे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश चौकर यांची दस्तऐवज तपासणी केली असता अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. यामध्ये सन 2019-20 तसेच 2020-21 या वर्षीच्या कॅश बुक, व्हाउचर फाईल नमुना नं. 12 वर सरपंचांच्या सह्या नसल्याचे आढळून आले, त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 मधील नियम 3 चा अवलंब केला नाही तसेच  प्रत्येक व्यवहाराची वसुली रक्कम कर्मचाऱ्याच्या हाती शिल्लक असणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011(8)चे उल्लघन करणे आहे, तसेच मासिक सभेचे इतिवृत्त वाचन न करणे, मासिक सभेत जमा खर्चास मंजुरी न घेणे, 14 व्या वित्त आयोग अंतर्गत स्वतःच्या नावे रू.52, 419 /- रक्कम काढणे, आराखड्या व्यतिरिक्त कामे करणे, साहित्य खरेदीची मासिक सभेत मंजुरी न घेणे, त्याचबरोबर ग्रामनिधीचा रू.3,69,142 तर  दि.27 मार्च 2020 ते 06.08.2020 या कालावधीत 14 व्या वित्त आयोग निधीमध्ये रू. 25,30,842 रक्कमेचा अनियमितपणा निदर्शनास आला असून यामध्ये रू.12,65,421 रक्कमेस सरपंच संध्या पाटील तर उर्वरित रू.12,65,421 रक्कमेस ग्रामविकास अधिकारी सुरेश चौकर जबाबदार असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम(1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) चे कलम 39(1) नुसार विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी सरपंच संध्या नाशिकेत पाटील यांना सरपंच पदासह ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावरून काढून टाकल्याचा आदेश दिला आहे. 

कोट - विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिलेल्या आदेशाचे स्वागत करताना जेष्ठ सदस्य चंदन पाटील यांनी समाधान व्यक्त केले, ते पुढे म्हणाले की, आजच्या निकालावरून सत्याचा विजय झाला असून भविष्यात सर्वांना सोबत घेऊन गावातील विकासकामांना प्राधान्य देऊ, असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर